साधा एलएडी आणि स्मार्ट एलएडी बल्बमध्ये काय फरक आहे? कोणता बल्ब घेणे ठरेल फायदेशीर
एलईडी बल्बचा वापर आता घरं, कार्यालये आणि दुकानांमध्ये केला जात आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का? की स्मार्ट एलईडी (Smart LED) देखील बाजारात उपलब्ध आहेत आणि ते सामान्य एलईडी बल्बपेक्षा वेगळे कसे आहेत?

मुंबई : आधिच्या तुलनेत विज खूपच महाग झाली आहे, 8 रुपये प्रति युनिट वीज बिल भरताना लोकांच्या खिशावरचा भार वाढत आहे. अशा परिस्थितीत एलईडी बल्बचा वापर आता घरं, कार्यालये आणि दुकानांमध्ये केला जात आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का? की स्मार्ट एलईडी (Smart LED) देखील बाजारात उपलब्ध आहेत आणि ते सामान्य एलईडी बल्बपेक्षा वेगळे कसे आहेत? जर नसेल तर तुम्हाला याबद्दलची माहिती अवश्य असायला पाहिजे. जाणून घेऊया सामान्य एलईडी आणि स्मार्ट एलईडीमध्ये काय फरक आहे. स्मार्ट एलईडी बल्ब अधिकाधिक लोकप्रिय होत असताना, या बल्बची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी लोक पूर्वीपेक्षा अधिक उत्सुक होत आहेत. आज आपण दोन्ही लाईटमधला फरक जाणून घेऊया, त्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार एलईडी बल्ब लावू शकाल.
सामान्य एलईडी बल्ब
सामान्य एलईडी बल्ब पांढरा प्रकाश सोडतात आणि ते आपल्यालाच चालू आणि बंद करावा लागतात. त्याचबरोबर त्यांचा प्रकाश गरजेनुसार पूर्ण होतो. हे बल्ब वेगवेगळ्या वॅटेजमध्ये येतात, जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरेदी करू शकता. सामान्य एलईडी बल्बची किंमत 50 रुपयांपासून सुरू होते आणि 200 रुपयांपर्यंत जाते. मात्र, त्यांची किंमतही आकारानुसार ठरवली जाते. परंतु त्यांची खरेदी करणे खूप किफायतशीर आहे. साधारण एलईडी बल्ब आकाराने लहान असतात, परंतु ते खूप शक्तिशाली असतात आणि ते तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात. ज्यांच्या घरी विद्यार्थी आहेत त्यांनी हेच बल्ब वापरावे.
स्मार्ट एलईडी बल्ब
स्मार्ट एलईडी बल्ब रंगीत असतात, हे बल्ब चालू-बंद करण्याची गरज नाही. अंधार पडल्यावर हे बल्ब आपोआप चालू आणि बंद होऊ शकतात. स्मार्ट एलईडी बल्ब अनेक आकारात उपलब्ध आहेत आणि तुम्ही ते तुमच्या आवडत्या आकारात निवडू शकता. स्मार्ट एलईडी बल्बची चमक सामान्य एलईडी बल्बपेक्षा कमी असते. मात्र, स्मार्ट एलईडी बल्बचा प्रकाश आणि रंग बदलता येतो. त्यांची सुरुवातीची किंमत 300 रुपयांपासून सुरू होते आणि 1000 रुपयांपर्यंत जाते. हे पार्टी किंवा सभोवतालची प्रकाशयोजना म्हणून वापरले जातात.
