AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp ला टक्कर देणाऱ्या Arattai चा मराठी अर्थ काय? Zoho चे मालक श्रीधर वेम्बू यांनी दिले खास उत्तर

Arattai Meaning : अरताई या भारतीय अ‍ॅपची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. व्हाट्सअ‍ॅपला देशी पर्याय म्हणून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे पाहिल्या जात आहे. झोहो कंपनीचा ई-मेल आणि इतर अनेक प्लॅटफॉर्म सध्या चर्चेत आहेत. अरताईचा मराठीत अर्थ काय होतो?

WhatsApp ला टक्कर देणाऱ्या Arattai चा मराठी अर्थ काय? Zoho चे मालक श्रीधर वेम्बू यांनी दिले खास उत्तर
अरताई
| Updated on: Oct 11, 2025 | 3:41 PM
Share

Arattai in different language : स्‍वदेशी कंपनी Zoho चे इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅप अरताईने देशभरात लोकप्रियता मिळवली आहे. व्हाट्सअ‍ॅपला हे अ‍ॅप टक्कर देत आहे. अवघ्या काही दिवसात प्ले स्टोअरवर केवळ 5 लाख डाऊनलोड असलेले हे अ‍ॅप आता 1 कोटींहून अधिक मोबाईलमध्ये डाऊनलोड झाले आहे. अनेक जण या अ‍ॅपचा वापर करत आहे. व्हाट्सअ‍ॅपला एक तगडा पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहण्यात येत आहे. पण अनेकांना अरताई हे नाव खास प्रभावी वाटत नाही. त्यांच्यामते या अ‍ॅपला जागतिक मंचावर जाण्यासाठी या नावाची अडचण येऊ शकते. सोशल मीडियावर अरताई या अ‍ॅपचे नाव बदलण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आता झोहो कंपनीचे मालक श्रीधर वेम्‍बु यांनी भारतीय भाषांमध्ये अरताईचा अर्थ काय होतो, हे स्पष्ट केले आहे.

मराठीत काय होतो अर्थ?

श्रीधर वेम्बू यांनी X वर याविषयीची लेटेस्ट पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी याविषयी एक कॅप्शन पण जोडली आहे. त्यात देशातील विविध भाषांमध्ये अरताईला काय म्हणतात, याची माहिती दिली आहे. त्यांनी भारतीय भाषांमध्ये अरताईचा अर्थ समजावून सांगितला आहे. मराठीत अरताईचा अर्थ गप्पा असा होतो. हिंदीत अरताईचा अर्थ गपशप असा होतो. तर इतर भाषेतही त्याचा अर्थ देण्यात आला आहे.

अरताई अ‍ॅपमध्ये लवकरच अपडेट

अरताई अ‍ॅपमध्ये लवकरच मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल होत आहे. त्यानंतर हे अ‍ॅप वापरणे अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. श्रीधर वेम्‍बु यांच्या पोस्टवर एका युझरने कमेंट केली आहे. त्यानुसार, अरताई हा शब्द भारतीय भाषेतीलच आहे आणि लवकरच लोकांना या शब्दाची सवय होईल. काही तांत्रिक बाबी अपडेट झाल्या तर हे अ‍ॅप बेस्ट होईल. श्रीधर वेम्‍बु यांनी सुद्धा लवकरच नवीन अपडेट समोर येणार असल्याचे म्हटले आहे.

आता झोहोचा अर्थ काय?

श्रीधर वेम्‍बु यांच्या पोस्टवर अनेक युझर्स लाईक करत आहेत. त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका युझर्सने अरताई हे नाव आवडल्याचे त्यांना सांगितले. तर दुसऱ्या एका युझर्सने जोहोचा विविध भाषेतील अर्थ काय होतो याची विचारणा केली आहे. जर देशातील प्रत्येक भाषेत या अ‍ॅपची आवृत्ती, व्हर्जन आले आणि AI Traslation सह इतर सुविधा मिळाल्या तर हे अ‍ॅप बाजारात गेमचेंजर ठरेल असे युझर्सचे म्हणणे आहे.

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.