Zoho Mail Account: झोहो मेल खाते तयार करणे एकदम सोपे, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
Zoho Mail Account : अनेकजण सध्या झोहो मेलकडे वळाले आहेत. जीमेल सोडून झोहोचा अनुभव घेण्यासाठी त्यांना मेल खाते तयार करायचे आहे. ही पद्धत अत्यंत सोपी आहे. स्टेप बाय स्टेप जाणून घ्या ही पद्धत

भारतीय कंपनी झोहो सध्या चर्चेत आली आहे. Zoho Corporation ने Arattai हे WhatsApp प्रमाणे सुरक्षीत भारतीय ॲप तयार केले आहे. हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, ग्रुप चॅट आणि मल्टिमीडिया शेअरिंगची सुविधा देते. त्याचसोबत इतर झोहो अॅप्सनी युझर्सचे लक्ष वेधले आहे. अनेकजण अमेरिकेच्या टॅरिफचा निषेध म्हणून जीमेलवरून झोहो मेलकडे वळाले आहेत. तुम्हाला पण झोहो मेल खाते तयार करायचे असेल तर ही पद्धत एकदम सोपी आहे. तुम्ही झटपट वैयक्तिक आणि व्यावसायिक खाते तयार करू शकता. स्टेप बाय स्टेप जाणून घ्या ही पद्धत.
झोहो मेल खाते तयार करण्यासाठी अगोदर तुम्हाला साईटवर जावे लागेल. त्यानंतर वैयक्तिक ईमेलचा पर्याय निवडावा लागेल.
आता युझर्सचे नाव निवडा, हाच तुमचा ईमेलचा पत्ता असेल
एक मोठं अक्षर, लहान अक्षरं, संख्या, विशेष चिन्ह यांचा मिळून एक पासवर्ड तयार करा
लक्षात ठेवा पासवर्ड हा कमीत कमी 8 Characters चा असावा.
तुमचे नाव, अडनाव आता रकान्यात नोंदवा.
तुमचा सध्याचा चालू मोबाईल क्रमांक नोंदवा, OTP द्वारे पडताळा करा.
अंतिम टप्प्यात सेवा,अटी स्वीकारून विनामूल्य साईन अप बटनवर क्लिक करा
फोनवरील कोड टाकून खाते व्हेरिफाय करा. झाले तुमचे खाते तयार
बिझनेस ईमेल खाते असे तयार करा
zoho.com/mail वर जा. येथे बिझनेस ई-मेलचा पर्याय निवडा
पूर्वीच्या डोमेनसह साईन अप करा. त्यासाठी अगोदर झोहोवर खाते असणे आवश्यक आहे
तुमचा व्यवसाय, संस्था याची माहिती द्या.
डोमेन नाव, कंपनीचे नाव आणि इतर आवश्यक माहिती नोंदवा.
डोमेन रजिस्ट्रारमध्ये DNS TXT रेकॉर्ड जोडा.
डोमेनचे मेल एक्सचेंजर (MX) रेकॉर्ड झोहो सर्व्हरकडे वळते करा
पुढील प्रक्रिया करुन सुपर अॅडमिन’ ईमेल सेट करा
आता या मेलमार्फत तुम्हाला पाच युझर्स जोडता येतील
ही गोष्ट लक्षात ठेवा
मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन सोयीची आहे. याचा नियमित वापर करा. त्यामुळे ई-मेल खाते अधिक सुरक्षित राहते. तुमचा पासवर्ड टाकून कुणीही तुमच्या खात्याचा ताबा मिळवू शकणार नाही. त्यामुळे SMS आधारीत ई-मेल पडताळा करण्याची सुविधा निवडा. तुम्ही जेव्हा पण ई-मेलवर लॉगिन कराल तेव्हा तुमच्या फोनवर एक कोड येईल. हा कोड टाकल्यावरच तुमचे खाते अनलॉक होईल. झोहो मेलमध्ये MFA च्या चार पद्धती आहेत. यामध्ये OneAuth, SMS बेस्ड OTP, OTP ऑथेंटिकेटर आणि YubiKey यांचा समावेश आहे. त्याआधारे खाते अधिक सुरक्षित होईल.
