AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp Channels : असे तयार करा स्वतःचे व्हॉट्सअप चॅनल! चुटकीत होईल काम

WhatsApp Channels : व्हॉट्सअपने नवीन फीचर रोलआऊट केले आहे. त्यामुळे सेलेब्रिटीसह दिग्गजांचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळतील. या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे चॅनल तयार करता येईल.

WhatsApp Channels : असे तयार करा स्वतःचे व्हॉट्सअप चॅनल! चुटकीत होईल काम
Image Credit source: Freepik
| Updated on: Sep 16, 2023 | 7:42 PM
Share

नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : व्हॉट्सअपने नुकतेच युझर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. त्याचे नाव व्हॉट्सअप चॅनल (WhatsApp Channels) असे आहे. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही जगभरातील अनेक सेलिब्रिटीशी थेट जोडल्या जाल. अनेक दिग्गजांनी तर WhatsApp Channels वर खाते पण तयार केले आहे. या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या सेलेब्रिटींविषयी आता तुम्हाला थेट त्यांच्या चॅनल्सवरुन अपडेट मिळतील. त्यासाठी तुम्हाला इकडे-तिकडे फिरण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हे फीचर आतापर्यंतच्या ग्रुप्स आणि कम्युनिटी चॅनलपासून वेगळे आहे. हे फीचर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड नाही. त्यामुळे या फीचरवर अनेक जण फिदा झाले आहेत. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्वतःचे व्हॉट्सअप चॅनल तयार करता येईल.

इन्स्टाग्रामच जणू

व्हॉट्सअपचे चॅनल हे जणू इन्स्टाग्रामचं आहे. यामध्ये एडमिनला फोटो, व्हिडिओ, व्हाईस नोट, इमोजी त्याच्या फॉलोअर्ससाठी पोस्ट करता येईल. लेटेस्ट अपडेट पण मिळवता येईल. व्हॉट्सअपने चॅनल फीचर आणल्यापासून अनेक जणांच्या डोक्यात एकच गोष्ट येत आहे की, स्वतःचे चॅनल कसे तयार करता येईल?

अनेक बदलांची नांदी

WhatsApp Channel फीचर ताजे ताजेच आहे. यामध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे. एडमिन एका महिन्यात त्याची पोस्ट एडीट करु शकतो. पण त्यानंतर त्याला एडिट करता येणार नाही. एडमिन पोस्ट करेल तेव्हा इतर युझर्सला चॅनल ज्वाईन होण्यासाठी लिंक देण्यात येईल. या फीचरशी जोडण्यासाठी अगोदर एप अपडेट करावे लागेल. तरच पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.

व्हाट्सअप चॅनल सुरु करताना हे ठेवा लक्षात

व्हॉट्सअप चॅनल सुरु करण्यासाठी तुमच्याकडे व्हॉट्सअप बिझनेस अकाऊंट असणे गरजेचे आहे. तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअपचे लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे. टू स्टेप व्हेरिफिकेशन असणे गरजेचे आहे. WhatsApp Channel तयार करण्यासाठी या स्टेप समजून घ्या.

असा सुरु करा चॅनल

  • स्टेप 1: सर्वात अगोदर व्हॉट्सअप उघडा.
  • स्टेप 2: त्यानंतर अपडेट टॅबवर जा. आयकॉनवर क्लिक करा. ऑप्शनवर क्लिक करा. याठिकाणी न्यू चॅनल पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.
  • स्टेप 3: Get Started वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवरील निर्देशांचे पालन करा.
  • स्टेप 4: चॅनलला नाव द्या, अकाऊंट तयार करा.
  • स्टेप 5: त्यानंतर चॅनल कस्टमाईज करण्याचा पर्याय मिळेल. अजून सर्वच मोबाईलवर हे फीचर येईल असे नाही. व्हॉट्सअप अपडेट करा. तरीही फीचर आले नसेल तर थोडा वेळ वाट पाहा.

Follow Us
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली