व्हॉट्सॲपचे ‘हे’ 5 फीचर्स आहेत कमालीचे, काही मिनिटांतच होतील सर्व काम
तुम्ही जर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुम्हाला यातील हे 5 फीचर्स माहित असायला हवे. कारण यामुळे तुमचे काम खूप सोपे होऊ शकते. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, तुम्ही या फिचर्सच्या मदतीने व्हॉट्सॲपवरील ही काम काही मिनिटांत सक्रिय करू शकता. चला तर याबद्दल जाणून घेऊयात...

व्हॉट्सॲप हा ॲप आता फक्त चॅटिंग पुरतेच मर्यादीत राहीले नाहीये, तर प्रत्येक महत्त्वाच्या कामाचा एक भाग बनला आहे. तुम्हाला एखाद्याला फोटो पाठवायचा असेल, पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा डॉक्युमेंट शेअर करायचे असेल, व्हॉट्सॲपद्वारे सर्वकाही काही मिनिटांत केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की व्हॉट्सॲपमध्ये असे काही अद्भुत फिचर्स आहेत ज्यामदतीने तुमचा वेळ तर वाचेलच आणि त्यासोबत तुमचे काम सोपे होईल. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपच्या 5 अद्भुत फिचर्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला व्हॉट्सॲपचा प्रो युजर बनवू शकतो.
मेसेज एडिट करण्याचे फिचर्स
जर तुम्ही चुकून काहीतरी चुकीचे टाइप करून मेसेज पाठवला असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवल्यानंतरही तो 15 मिनिटांत एडिट करता येतो. कोणताही पाठवलेला मेसेज जास्त वेळ दाबून ठेवा. आता चॅटमध्ये वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तीन ठिपके दिसेल त्यावर क्लिक करा, आता तुमच्या समोर अनेक पर्याय येतील त्यातील एडिट पर्याय निवडा. मजकूर बदला आणि सेव्ह करा.
व्हॉइस मेसेज प्रीव्ह्यू करून पाठवा
आता व्हॉइस मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर तो पाठवण्याआधी तुम्ही तो ऐकू शकता आणि योग्य वाटल्यासच पाठवू शकता. अशा प्रकारे कोणत्याही त्रुटीची किंवा चुकीचा मेसेज पाठवण्याची चिंता राहणार नाही.
यासाठी, माइक आयकॉन वर स्लाइड करा. रेकॉर्डिंग पूर्ण करा. आता प्ले करा आणि पाठवण्यापूर्वी ते ऐका. यानंतर तुमचे काम पूर्ण होईल.
पेमेंट फिचर्स
आता तुम्ही WhatsApp वर UPI द्वारे काही मिनिटांत पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकता. चॅटमधील ₹ आयकॉन दाबा. त्यानंतर, रक्कम एंटर करा आणि पाठवा. यामुळे पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर होतील.
मेसेज पिन करा
जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे किंवा ग्रुपचे मेसेज सर्वात वर ठेवायचे असतील तर ते पिन करा. चॅट दाबा, पिन पर्याय निवडा, तो चॅट नेहमीच सर्वात वर दिसेल.
डिस्पॅरिंग मेसेज
आता तुम्ही या सेंटिगद्वारे कोणत्याही चॅटवर बोलताना मेसेज काही वेळाने आपोआप गायब होतील. यासाठी प्रथम व्हॉट्सॲपवर चॅट उघडा. प्रोफाइलवर क्लिक करा. त्यानंतर, Disappearing Messages हा पर्याय ऑन करा. त्यानंतर त्या चॅटची वेळ सेट करा, यासाठी 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवस हे पर्याय दिलेले असतात. यातील तुमच्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.