WhatsApp ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचर अपग्रेड करणार, जाणून घ्या नवे अपडेट्स

| Updated on: Nov 04, 2021 | 7:28 AM

WhatsApp लवकरच आपल्या 'डिलीट फॉर एव्हरीवन' फीचरमध्ये बदल करणार आहे. WaBetaInfo च्या ताज्या अहवालानुसार कंपनी या फीचरसाठी टाइम लिमिट वाढवू शकते.

WhatsApp डिलीट फॉर एव्हरीवन फीचर अपग्रेड करणार, जाणून घ्या नवे अपडेट्स
WhatsApp
Follow us on

मुंबई : काही रिपोर्ट्समधून अशी माहिती मिळाली आहे की, WhatsApp लवकरच आपल्या ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचरमध्ये बदल करणार आहे. WaBetaInfo च्या ताज्या अहवालानुसार कंपनी या फीचरसाठी टाइम लिमिट वाढवू शकते. ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ हे फीचर मुळात 2017 मध्ये सादर करण्यात आले होते. सध्या मेसेजिंग सर्विसने आपल्या वापरकर्त्यांना दिलेले हे सर्वात उपयुक्त आणि महत्त्वाचे फीचर आहे. एखाद्या युजरने चुकून एखाद्या ग्रुप किंवा वैयक्तिक चॅटवर चुकीचा मेसेज पाठवल्यास तो मेसेज सर्वांसाठी डिलीट करण्याचा पर्याय या फीचरच्या मदतीने उपलब्ध झाला आहे. (WhatsApp will upgrade ‘Delete for Everyone’ feature, know details)

व्हॉट्सअॅपने याआधी हे फीचर सात मिनिटांच्या मर्यादेसह सादर केले होते आणि काही महिन्यांनंतर ते एका तासापेक्षा जास्त करण्यात आले. WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, आता असे दिसते आहे की कंपनी या फीचरची टाईम लिमिट अनिश्चित काळासाठी वाढवू शकते.

कंपनीकडून फीचरवर संशोधन

एका सूत्राने सांगितले की, नवीन डेव्हलपमेंट व्हॉट्सअॅपच्या v2.21.23.1 Android बीटा व्हर्जनमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. हे फीचर अद्याप विकसित होत आहे. मात्र वापरकर्त्यांनी या नवीन अपडेटबद्दल लगेच खूप उत्साहित होऊ नये, कारण जोपर्यंत ते सर्व बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध होत नाही, तोवर हे फीचर कधी रोलआऊट हेईल, हे सांगता येणार नाही. हे फीचर युजर्ससाठी केव्हा जारी केले जाऊ शकते याची पुष्टी सूत्रांनी केलेली नाही.

सध्या मेसेज डिलीट करण्यासाठी एक तासाचा वेळ मिळतो

सध्या व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना मेसेजिंग चॅटमधील वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमधील मेसेज डिलीट करण्यासाठी फक्त एक तास मिळतो. एकदा मेसेज डिलीट झाला की, अॅप चॅट विंडोमध्ये ‘deleted this Message’ असे एक नोटिफिकेशन दिसते. तथापि, डिलीट केलेले व्हॉट्सअॅप मेसेज तपासण्याचे मार्ग देखील आहेत.

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी ही ट्रिक वापरा

अनेकदा आपण मेसेज वाचण्याआधीच समोरच्या युजरने मेसेज डिलीट केलेला असतो. अशा वेळी त्या मेसेजमध्ये काय लिहिलं होतं, त्या युजरने आपल्याला काय पाठवलं होतं, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तो मेसेज वाचण्यासाठी आपण उत्सुक असतो. परंतु WhatsApp मध्ये असं कोणतंही फिचर नाही, ज्याद्वारे आपण डिलीट केलेले मेसेज वाचू शकतो. परंतु आम्ही तुम्हाला डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही डिलीट केलेले मेसेज मिळवू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला एक थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करावं लागेल. दरम्यान तुम्हाला एक बाब लक्षात ठेवावी लागेल की, WhatsApp अशा कोणत्याही गोष्टीला प्रमोट करत नाही. तसेच या थर्ड पार्टी अ‍ॅपचा तुमच्या प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही या ट्रिकचा वापर करायला हवा.

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज मिळवण्याची ट्रिक

  • डिलीटेड मेसेज वाचण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अँड्रॉयड फोनवर WhatsRemoved+ अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागेल.
  • WhatsRemoved+ अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन्स अॅक्सेप्ट कराव्या लागतील.
  • अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला फोन नोटिफिकेशनचा अॅक्सेस द्यावा लागेल.
  • त्यानंतर तुम्ही असे अ‍ॅप्स निवडा ज्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायचे आहेत.
  • यामध्ये तुम्हाला WhatsApp मेसेज इनेबल करावं लागेल. त्यानंतर continue बटणावर क्लिक करा. तसेच तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामचाही पर्याय दिसेल. तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामचेही नोटिफिकेशन्स हवे असल्यास तुम्ही त्यांचे पर्याय इनेबल करु शकता.
  • आता तुम्ही थेट अशा पेजवर जाल जिथे तुम्हाला डिलीट केलेले सर्व मेसेज दिसतील.

गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अ‍ॅप उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील डिलीट केलेले मेसेज वाचू शकता. परंतु हे अॅप्स केवळ अँड्रॉयड युजर्ससाठी आहेत, आयओएस युजर्ससाठी कोणतंही अॅप उबलब्ध नाही. शिवाय त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती उपलब्ध नाहीत.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(WhatsApp will upgrade ‘Delete for Everyone’ feature, know details)