अवघ्या 15 मिनिटात फुल चार्ज होणारा Xiaomi चा नवीन फोन बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

Xiaomi 11i ची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे, ज्यामध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज वेरिएंटची किंमत 26999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

अवघ्या 15 मिनिटात फुल चार्ज होणारा Xiaomi चा नवीन फोन बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात
Xiaomi 11i HyperCharge 5G
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 8:00 AM

मुंबई : Xiaomi ने गेल्या आठवड्यात भारतात आपले दोन स्मार्टफोन Xiaomi 11i HyperCharge 5G आणि Xiaomi 11i सादर केले आहेत. Xiaomi 11i हायपरचार्ज फोन हा सर्वात फास्ट चार्जिंग क्षमता असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन आहे, जो केवळ 15 मिनिटांत 0-100 टक्के बॅटरी चार्ज करू शकतो. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये जवळपास एकसारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. यामध्ये केवळ हायपर चार्जर आणि बॅटरीचा फरक आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन MIUI 12.5 वर काम करेल. (Xiaomi 11i HyperCharge 5G smartphone sale live from today 12 noon, Know price, features)

Xiaomi 11i ची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे, ज्यामध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज वेरिएंटची किंमत 26999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. Xiaomi 11i HyperCharge 5G मधील 6GB RAM + 128GB व्हेरिएंटची किंमत 26999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट असलेल्या फोनची किंमत 28,999 रुपये आहे. हा फोन तुम्ही आज (12 जानेवारी) दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

Xiaomi 11i HyperCharge 5G आणि Xiaomi 11i चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 11i आणि 11i Hypercharge जवळजवळ सारख्या स्पेसिफिकेशन्ससह येतात, या दोन फोनमधील फरक फक्त हायपर चार्ज आणि चार्जिंग स्पीडचा आहे. युजर्सना हायपरचार्ज व्हेरियंट अंतर्गत 120W चार्ज अॅडॉप्टर मिळेल. Xiaomi 11i मध्ये 4500 mAh ची ड्युअल बॅटरी आणि 67W चा फास्ट चार्जर आहे. तर Xiaomi 11i हायपरचार्जमध्ये 5160 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Xiaomi 11i HyperCharge 5G आणि Xiaomi 11i मध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनचा पीक ब्राईटनेस 120nits पर्यंत आहे. यात G-OLED (इन-सेल) डिस्प्ले आहे.

या फोन्समध्ये MediaTek Dimension 920 चिपसेट वापरण्यात आला आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे, ज्यामध्ये मायक्रोएसडी कार्ड टाकले जाऊ शकते. आवश्यक असल्यास युजर्स यामध्ये 1 टीबी पर्यंतचे एसडी कार्ड जोडू शकतात. Xiaomi 11i हायपरचार्ज 5G व्हेपर चेंबर कूलिंगसह येतो. हा फोन 5G 8bands ला सपोर्ट करतो. यामध्ये युजर्स 1 टीबी पर्यंत एसडी कार्ड जोडू शकतात.

Xiaomi 11i HyperCharge 5G चा कॅमेरा सेटअप

या फोनच्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. यात HM2 सेन्सर आहे. यात ड्युअल नेटवर्क iOS तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आलं आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सल्सचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच इतर दोन कॅमेरे आहेत. या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जातो. हा कॅमेरा सेटअप 4K रिझोल्यूशनसहे व्हिडिओ कॅप्चर करू शकतो.

इतर बातम्या

Google | वृत्त संकलनातील एकाधिकारशाहीचा दुरुपयोग, गुगलविरोधात भारतात चौकशीचे आदेश

शानदार ऑफर! Oppo चा 12 हजारांचा स्मार्टफोन 9 हजार रुपयांत खरेदीची संधी

कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत

(Xiaomi 11i HyperCharge 5G smartphone sale live from today 12 noon, Know price, features)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.