रेडमी नोट 6 प्रोच्या किंमतीत 2 हजार रुपयांची घट

रेडमी नोट 6 प्रोच्या किंमतीत 2 हजार रुपयांची घट

मुंबई : शाओमीने स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रोच्या 6 जीबी व्हेरिअंटच्या किंमतीत घट केली आहे. आता या फोनची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हा फोन Mi.com आणि फ्लिपकार्टवर खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये 4 जीबी मॉडलच्या किंमतीतही 2 हजार रुपयांची घट केली आहे आणि आता हा फोन 11 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. हा फोन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केला होता.

कंपनीने नुकतेच रेडमी नोट 7 प्रो लाँच केला आहे. फोनचेमध्ये नॉच डिस्प्ले, ड्युअल सेल्फी कॅमेरा, P2i वॉटर आणि 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी स्मार्टफोनवर ऑफर्स

रेडमी नोट 6 प्रो खरेदीवर mi.com वर नो कॉस्ट ईएमआय देण्यात आली आहे. याशिवाय 2 हजार 400 रुपयांचा इन्स्टन्ट कॅशबॅक आणि 6TB जिओ डेटा बेनिफिट्स मिळत आहे. तसेच एक्सिस बँक कार्डचा वापर केला तर 10 टक्के डिस्काऊंटही दिला जात आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

  • 6.26 इंचाचा डिस्प्ले, गोरिल्ला ग्लास
  • 1.8 गीगाहर्टज ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर
  • 4 आणि 6 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज
  • 4000mAh बॅटरी क्षमता
  • बॅटरी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलजी
  • फिंगर प्रिंट आणि इन्फ्रारेड सेन्सर
  • अँड्रॉईड 8.1 ओरियो ऑपरेटिंग सिस्टम

Published On - 5:38 pm, Mon, 3 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI