भारतात लाँच होणार शाओमीचा ‘ब्लॅक शार्क 2’, पाहा किंमत

नवी दिल्ली : शाओमीने चीनमध्ये गेमिंग बेस स्मार्टफोन ब्लॅक शार्क 2 लाँच केला आहे. लवकरच कंपनी भारतात हा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा गेमिंग स्मार्टफोन आहे आणि यामध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी उत्तम दर्जाचे हार्डवेअर दिलेले आहेत. या फोनची डिझाईन पाहता प्रत्येकाला आकर्षित करेल अशी या फोनची डिझाईन आहे. शाओमीने पहिल्यांदा सर्वात वेगळ्या आणि हटके अशा डिझाईनमध्ये […]

भारतात लाँच होणार शाओमीचा 'ब्लॅक शार्क 2', पाहा किंमत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

नवी दिल्ली : शाओमीने चीनमध्ये गेमिंग बेस स्मार्टफोन ब्लॅक शार्क 2 लाँच केला आहे. लवकरच कंपनी भारतात हा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा गेमिंग स्मार्टफोन आहे आणि यामध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी उत्तम दर्जाचे हार्डवेअर दिलेले आहेत.

या फोनची डिझाईन पाहता प्रत्येकाला आकर्षित करेल अशी या फोनची डिझाईन आहे. शाओमीने पहिल्यांदा सर्वात वेगळ्या आणि हटके अशा डिझाईनमध्ये हा फोन लाँच केला आहे. या फोनच्या मागच्या बाजूला एस नावाचा लोगोही दिसत आहे. त्यामुळे अंधारातही हा लोगो उठून दिसतो.

ब्लॅक शार्क 2 फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे. यामध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले आहे आणि 4000 mAh बॅटरी आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये 27W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.

ब्लॅक शार्क 2 मध्ये स्क्रीनखाली फिंगरप्रिंट स्कॅनल दिला आहे. गेमर्सच्या मदतीसाठी फोनच्या चारही बाजूने प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टम दिला आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 48+12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

या फोनमध्ये दोन रंगाचा पर्याय दिला आहे. फ्रोजेन सिल्व्हर आणि शॅडो ब्लॅक. फोनची किंमत चीनमध्ये 3,200 युआन आहे म्हणजे भारतीय रुपयात अंदाजे 33 हजार रुपये. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये 4,200 युआन म्हणजेच भारतीय रुपयात 43 हजार रुपये आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.