AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फटाक्यासारखा फुटू शकतो तुमचा फोन, बॅटरी चार्ज करण्याची ही पद्धत येऊ शकते अंगलट

अनेकदा लोकं रात्री झोपल्यावर फोन चार्जिंगवर (Smartphone Charging) ठेवतात, त्यामुळे सकाळपर्यंत फोन पूर्ण चार्ज होतो. मात्र ही सवय अपघाताला आमंत्रण देणारी आहे.

फटाक्यासारखा फुटू शकतो तुमचा फोन, बॅटरी चार्ज करण्याची ही पद्धत येऊ शकते अंगलट
स्मार्टफोन चार्जींग Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 24, 2023 | 7:24 PM
Share

मुंबई : स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः बॅटरीमुळे हे स्फोट होतोत. योग्यरित्या चार्ज न केल्यास फोनचा स्फोट होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो. अनेकदा लोकं रात्री झोपल्यावर फोन चार्जिंगवर (Smartphone Charging) ठेवतात, त्यामुळे सकाळपर्यंत फोन पूर्ण चार्ज होतो. मात्र ही सवय अपघाताला आमंत्रण देणारी आहे. अशाच काही सवयी तुमच्यासाठी जिवघेण्य ठरू शकतात.

रात्रभर फोन चार्ज करू नका

तुम्हीही स्मार्टफोन रात्रभर चार्ज करत असाल तर थोडी काळजी घेण्याची गरज आहे, कारण यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी खराब होऊ शकते. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे फोन रात्रभर चार्ज केल्यामुळे त्याचा स्फोट होऊ शकतो.

लोकल चार्जरपासून दूर राहा

बाजारात अनेक प्रकारचे लोकल चार्जर उपलब्ध आहेत. मूळ चार्जर हरविल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर लोकं स्थानिक चार्जर खरेदी करतात. स्थानिक चार्जर फोनला बराच वेळ चार्ज करतो आणि बॅटरी देखील गरम करतो. यामुळे बॅटरी लवकर खराब होते.

प्रथम फोनची क्षमता तपासा

आता अनेक कंपन्या स्मार्टफोनसोबत बॉक्समध्ये चार्जर देत नाहीत. अशा स्थितीत नवा फोन घेणार्‍यांनी क्षमता किती आहे हे पाहावे. त्यानुसार चार्जर खरेदी करा. असे न केल्यास स्मार्टफोनच्या बॅटरीवर दाब पडू लागतो आणि प्रक्रियेचा वेगही कमी होतो. चुकूनही अशी चूक करू नये, नेहमी स्मार्टफोनची क्षमता असलेला चार्जर खरेदी करा.

फोन कधी चार्ज करायचा

फोन वारंवार चार्ज केल्याने बॅटरीवर दबाव येतो. त्यामुळे लक्षात ठेवा की फोनची बॅटरी 20 टक्के किंवा त्याहून कमी असेल तेव्हाच चार्ज करा. असे केल्याने बॅटरीवर कोणताही दबाव येणार नाही आणि बॅटरी लवकर खराब होणार नाही.

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.