फुटकं नशीब; लॉटरी लागली 1700 कोटींची; अन् क्षणात तिच लॉटरी शून्यातही गेली…

कोणतीही लॉटरी जिंकायची असेल तर त्याला खूप मोठ्या नशीबाची साथ लागते. म्हणजे तुम्हाला खरच नशिबाची साथ मिळाली तर तुम्ही काही सेकंदात कोट्यधीश होण्यास वेळ लागणार नाही. आणि जर तुमचं नशिबच जर तुमच्यासोबत नसेल तर मात्र हातात आलेली लॉटरीही तुम्हाला मिळणार नाही.

फुटकं नशीब; लॉटरी लागली 1700 कोटींची; अन् क्षणात तिच लॉटरी शून्यातही गेली...
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 1:45 AM

नवी दिल्लीः तुमचे नशीब चांगले असेल आणि ते तुमच्या नशिबाचे तारे तुमच्यासोबतच असतील तर छोट्या छोट्या गोष्टीतूनही तुम्हाला मोठं यश मिळू शकतं आणि माणूस काही सेकंदात करोडपतीही होऊ शकतो. आणि तुमच्या नशिबातील तारे फिरले असतील तर मात्र जरी तुम्ही उंटावर बसला असला तरी तुम्हाला कुत्रा हा चावणारच. म्हणजे कधी कधी असं म्हटलं जातं की, सगळं काही ठिक चाललेलं असतानाही तुमच्या नशिबानेच तुमची साथ सोडली असेल तर तुमच्या हातातील चांगल्या गोष्टी दुसऱ्याच्या हातात जाण्यास वेळ लागत नाही. असाच एक प्रकार आता ब्रिटनमध्ये (Britain) घडला आहे. तेथील एका महिलेला तिच्या नशिबाने जर तिला साथ दिलीच असती तर ती आज एकटी 1700 कोटींची मालकीन (Owner of 1700 crores) बनली असती.

आम्ही जे प्रकरण तुम्हाला सांगणार आहे ते प्रकरण आहे ब्रिटनमधील. ब्रिटनमधील रॅचेल कॅनेडीजवळ (Rachel Kennedy) जर आणखी काही पैसे असते तर ती लॉटरीच्या माध्यमातून हजार ती हजारो कोटींची मालकीन बनू शकली असती.

युरोमिलियन्सची तिकिटे खरेदी

इंग्रजी वेबसाईट द सनच्या वृत्तानुसार रॅचेल केनेडी आणि तिचा बॉयफ्रेंड लियाम मॅक्क्रोहनसह, ती गेल्या काही अनेक आठवड्यांपासून युरोमिलियन्सची तिकिटे खरेदी करत होती. या गोष्टीतील एक विशेष गोष्टी ही आहे की, ती नेहमी त्याच नंबरच्या लॉटरीचे तिकीट निवडत होती. कारण तिला प्रचंड आशा होती की, एक दिवस तिला नक्की याच नंबरची लॉटरी लागेल..

1734 कोटीपेक्षाही अधिकची लॉटरी

रॅचेल आणि लियाम या दोघांनी मिळून एकाच नंबरच्या सिरिजवर (6, 12, 22, 29, 33, 6 आणि 11) लॉटरीचा खेळ खेळला. यावेळी रॅचेल आणि तिच्या मित्राला 182 मिलियन पाऊंडची म्हणजे 1734 कोटीपेक्षाही अधिकची त्यांना लॉटरी लागली. जशी ही गोष्ट रॅचेलला समजली त्याबरोबर तिने आपला मित्र आणि आपल्या आईबरोबर ती भविष्याच्या प्लॅनिंग करू लागली.

फोन केला आणि धक्का बसला

रॅचेलला आपल्याला लॉटरी लागली आहे त्याच्यावर तिला विश्वासच बसला नाही, कारण ज्या नंबरवर तिने हा लॉटरीचा खेळ खेळला होता, त्या नंबरवर तिला 182 मिलियन पाऊंडची लॉटरी लागली आहे. आपल्याला लॉटरी खरच लागली आहे का, आणि लागली असेल तर त्याची चौकशी करायची म्हणून तिने युरोमिलियन्सच्या ऑफिसमध्ये तिने फोन लावला, आणि तिला धक्क्यावर धक्के बसले, आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

रक्कम कमी असल्यानेच कोट्यवधी रुपये गेले

रॅचेलने लॉटरीच्या ऑफिसमध्ये फोन केल्यावर तिला सांगण्यात आले की, रॅचेल ज्या लॉटरी नंबरवर खेळली मात्र तिला त्या लॉटरीचे बक्षीस मिळू शकले नाही. कारण तिने जेव्हा लॉटरी कंपनीकडून तिकीट खरेदी केली तेव्हा, तिच्या खात्यात 238 युरो होते आणि तिला आणि खेळासाठी लागणारे होते, 240 युरो. तिच्याकडे पैसे कमी असल्याने ती ते तिकीट खेरदी करू शकली नाही, आणि इतक्या मोठ्या रक्कमेची ती लॉटरी तिच्या हातातून निसटून गेली.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.