टिकटॉकवर 65 वर्षीय व्यक्ती 25 वर्षीय तरुणीच्या प्रेमात, पत्नीला घटस्फोट द्यायला तयार
टिकटॉकवर 65 वर्षीय व्यक्ती एका 25 वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडली. हा व्यक्ती आता पत्नीला घटस्फोट देऊन त्या 25 वर्षीय मुलीशी लग्न करण्यासाठी नायजेरियाला जाण्याचे स्वप्न पाहत आहे. वयोवृद्धांच्या या कृतीमुळे कुटुंबीय संतप्त झाले आहेत.

डिजिटल जगात किंवा या ऑनलाईनच्या जमान्यात जितके फायदे आहेत तितके तोटेही आहे. टिकटॉकच्या माध्यमातून लोक व्हिडिओ पाहतात आणि प्रेमात पडतात, असे यापूर्वी अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण, आज आम्ही एक वेगळीच स्टोरी तुम्हाला सांगणार आहोत. या प्रकरणात तरुण नव्हे तर 65 वर्षीय व्यक्ती एका 25 वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडला आहे. याबाबत त्या वृद्धाचे कुटुंबिय चिंतेत आहेत.
एका 65 वर्षीय व्यक्तीच्या घटस्फोटाचे प्रकरण सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. खरं तर वृद्ध एका मुलीच्या प्रेमात पडून आपले वर्षानुवर्षे जुने वैवाहिक जीवन मोडणार आहे. वृद्धांच्या या कृत्याने युरोपियन कुटुंब प्रचंड अस्वस्थ झाले आहे.
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय वृद्ध एका 25 वर्षीय टिकटॉकरच्या प्रेमात आहे आणि नायजेरियातील लागोसयेथे जाऊन तिच्याशी लग्न करू इच्छितो. हे दोघे वर्षभरापासून एकमेकांच्या संपर्कात असून या दरम्यान वृद्धाने मुलीला अनेकवेळा पैसेही पाठवले आहेत. इतकंच नाही तर वृद्धानी व्हिसासाठी अर्जही केला आहे.




एका रेडिट युजरने स्वतःला एका वृद्ध व्यक्तीचा पुतण्या असल्याचा दावा करत ही संपूर्ण कहाणी इंटरनेटवर शेअर केली आहे. पोस्टनुसार, माझे काका 65 वर्षांचे आहेत आणि विवाहित आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांचे टिकटॉकवर एका नायजेरियन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या मुलीचे वय जेमतेम 20 ते 25 वर्ष आहे. दोघांमधील संभाषण गप्पांनी सुरू झाले, मग काका वेगवेगळ्या कारणांसाठी मुलीला पैसे पाठवत राहिले.
रेडिट युजरने पुढे सांगितले की, या दरम्यान कुटुंबातील सदस्यांनी थांबण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते कोणाचेही ऐकायला तयार नाहीत. मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकतात, अशी भीती कुटुंबियांना सतावत आहे. पुतण्याने सांगितले की, त्याच्या कुटुंबाला काकांसोबत काहीतरी अनुचित प्रकार होण्याची भीती होती.
अपेक्षेप्रमाणे या पोस्टने अनेक युजर्सना आकर्षित केले आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला. एका युजरने शंका व्यक्त करत लिहिले की, ‘तुमचे काका ऑनलाइन घोटाळ्यात अडकल्यासारखे दिसत आहे.’ या बाबतीत नायजेरियाही अशीच बदनाम आहे. आणखी एका युजरने म्हटले की, त्यांना प्रेमाने समजावून सांगा, ते मान्य करतील अन्यथा सायबर सेलची मदत घ्या. आणखी एका युजरने कमेंट केली की, “मला आश्चर्य वाटत आहे की कोणी दुसऱ्यासाठी जुने नाते कसे तोडू शकते.”