83 वर्षीय आजीचे 23 वर्षांच्या मुलावर प्रेम! नातवामुळे जमली जोडी.. हसत हसत सांगितली रात्रीची गोष्ट
83 वर्षांच्या आजी आपल्या नातवाच्या 23 वर्षीय वर्गमित्रासोबत गेल्या सहा महिन्यांपासून नात्यात आहेत. रस्त्यावर त्यांना हातात हात घालून फिरताना पाहून सर्वजण थक्क होतात.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, जपानमधील कोफु जेव्हा पहिल्यांदा आपल्या वर्गमित्राच्या घरी गेला तेव्हा त्याची आइको यांच्याशी भेट झाली आणि येथूनच त्यांचे नाते पुढे सरकले. नुकतेच त्यांना रस्त्यावर मुलाखतीदरम्यान एकत्र पाहिले गेले, त्यानंतर ही जोडी रातोरात प्रसिद्ध झाली. आइको यांचे दोनदा लग्न झाले आहे, ज्यापासून त्यांना एक मुलगा, एक मुलगी आणि पाच नातवंडे आहेत. घटस्फोटानंतर त्या आपल्या मुलाच्या कुटुंबासोबत राहत होत्या. तर कोफु युनिव्हर्सिटीतून पदवी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे आणि एका क्रिएटिव्ह डिझाइन कंपनीत इंटर्नशिप करत आहे.
कशी सुरु झाली प्रेमकहाणी?
कोफु आणि आइको दोघांचेही म्हणणे आहे की हे पहिल्या नजरेत झालेले प्रेम आहे. आइको म्हणाल्या, ‘कोफु खूप नम्र आहे आणि त्याचा स्वभाव अत्यंत उत्साही आहे. मी कधीही इतका उत्साहपूर्ण माणूस पाहिला नाही.’ मात्र, वयातील मोठ्या अंतरामुळे दोघांनी सुरुवातीला आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे टाळले. पण मग एक वळण आले जेव्हा आइको यांच्या नातवाने डिझनीलँडच्या सहलीचे नियोजन केले आणि शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्या वेळी कोफु आणि आइको एकटे राहिले. सिंड्रेला कॅसलसमोर सूर्यास्ताच्या वेळी कोफुने आइको यांच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली.
वाचा: अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या; प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेत्रीने फोडला हंभरडा
हसतहसत सांगितली रात्रीची गोष्ट
त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, पण त्यांनी कोणाच्या घरी राहतात हे सांगितले नाही. वृत्तानुसार, नाते जाहीर झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. लग्नाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. कोफु म्हणतो की, त्यांना फक्त इतकेच पुरेसे आहे की, दररोज सकाळी पहिल्यांदा आइको यांचा चेहरा पाहायला मिळतो. तर आइको म्हणाल्या की, जेव्हा कोफु कामावर जातो तेव्हा त्यांना एकटेपणा जाणवतो, पण त्यांच्यासाठी जेवण बनवणे त्यांना ऊर्जा देते. आइको हसत म्हणाल्या, ‘तो रात्री झोपण्यापूर्वी माझे दातही ब्रश करायला लावतो.’
या अनोख्या प्रेमकहाणीने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. काही लोक या नात्याला खऱ्या प्रेमाचे उदाहरण मानत आहेत, तर काही लोक इतक्या मोठ्या वयाच्या अंतरावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
