AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Marathe Death: अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या; प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेत्रीने फोडला हंभरडा

Priya Marathe Death: सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण अभिनेत्री प्रिया मराठेला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. दरम्यान, एका अभिनेत्रीने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Priya Marathe Death: अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या; प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेत्रीने फोडला हंभरडा
Priya Marathe Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 31, 2025 | 5:29 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे आज, 31 ऑगस्ट रोजी पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 38व्या वर्षी तिने मीरा रोड येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेताल. प्रिया गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. तिची ही झुंज अपयशी ठरली. प्रियाच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडेने पोस्ट शेअर केली आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल कशाप्रकारे नकारात्मक प्रतिक्रिया तिच्याबद्दलची कोणतीही पार्श्वभूमी ठाऊक नसताना केल्या जातात. आणि हे किती असंवेदनशील आहे याबद्दल मुग्धा यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाल्या मुग्धा?

मुग्धा यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, ‘जुलै 2023 मध्ये प्रियाने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला होता. ‘ प्रकृतीच्या कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून मी बाहेर पडते आहे.’ चॅनेलनेही आपल्या official page वरून तो व्हिडिओ शेअर केला. प्रियाला कॅन्सर झाला होता. तरीही ती काही काळ शूटिंग करत होती पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती. त्या मालिकेत ती नकारात्मक भूमिका करत होती. त्याचा परिणाम म्हणून असेल, पण त्या व्हिडीओ खाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या होत्या. इथे उच्चारता येणार नाहीत अश्या. काय वाटलं असेल तिला?’ असे म्हटले होते.

वाचा: अखेर रिंकूने आकाशसोबतच्या नात्यावर सोडले मौन, ‘तेव्हापासून आमच्यात…’

पुढे त्या म्हणाल्या, ‘प्रिया गेली. दोन वर्ष झगडून थकली. त्याबद्दल अतोनात दुःख आहे. फार कमी गोष्टींनी मी इतकी अस्वस्थ होते. एरवी तशी मी टगी आहे. पण प्रिया फार गोड मुलगी होती. फार सज्जन. राहून राहून पुन्हा तोच प्रश्न. का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट? कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भाबडे राहिले आहेत का? कलाकार, त्याचं काम, प्रतिमा यातला फरक न कळण्याइतके? स्वतःमधलं काहीतरी घाणेरडं बाहेर काढायचा मार्ग झालाय तो आता. एकानं सुरू केलं की सगळे सुरू होतात. विष पसरत जातं. असो. प्रिया… फार फार दुर्दैवी घटना.’

प्रियाच्या कामाविषयी

प्रियाने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने काही मराठी मालिकांमध्ये काम केले. ते पाहून तिला ‘कसम से’ या हिंदी मालिकेची ऑफर आली. या मालिकेच्या माध्यमातून तिने हिंदी टीव्ही विश्वात पदार्पण केले. तिची ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील भूमिका विशेष गाजली होती.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.