AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: हत्तीच्या पिल्लाची वनाधिकाऱ्याला मिठी, व्हिडीओनंतर आता फोटोही व्हायरल, नेटकरी फोटो पाहून भावनिक

काही दिवसांपूर्वी देखील एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात एक हत्तीचं पिल्लू त्याच्या आईपासून वेगळं होतो. प्रत्येकाला हा व्हिडिओ खूप आवडला आणि व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक झाले. आता अजून एक फोटो समोर आला आहे, ज्यात हत्ती बचाव पथकाला मिठी मारत आहे.

Video: हत्तीच्या पिल्लाची वनाधिकाऱ्याला मिठी, व्हिडीओनंतर आता फोटोही व्हायरल, नेटकरी फोटो पाहून भावनिक
व्हायरल होत असलेल्या फोटोत, बचाव पथकाचा एक अधिकारी आरामात उभा आहे आणि त्याच्या जवळ एक छोटा हत्ती देखील दिसत आहे.
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 12:58 PM
Share

आई आणि मुलाचे नातं खूप सुंदर असते. कोणतीही आई किंवा मूल एकमेकांशिवाय जगू शकत नाही. असे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप दिसतात. काही दिवसांपूर्वी देखील एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात एक हत्तीचं पिल्लू त्याच्या आईपासून वेगळं होतो. प्रत्येकाला हा व्हिडिओ खूप आवडला आणि व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक झाले. आता अजून एक फोटो समोर आला आहे, ज्यात हत्ती बचाव पथकाला मिठी मारत आहे. ( A child of a small elephant was seen hugging the person of the rescue team the picture is going viral)

व्हायरल होत असलेल्या फोटोत, बचाव पथकाचा एक अधिकारी आरामात उभा आहे आणि त्याच्या जवळ एक छोटा हत्ती देखील दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे हत्ती त्याच्या सोंडेने अधिकाऱ्याला मिठी मारत आहे. हा फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो IFS परवीन कासवानने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – प्रेमाला कोणतीही भाषा नाही… हत्तीचं पिल्लू वनपरिक्षकाला मिठी मारत आहे… टीमने या पिल्लाला वाचवले आणि आईशी त्याची ओळख करून दिली.

पाहा फोटो:

आता हजारो लोकांना हा फोटो आवडला आहे. नेटकऱ्यांनी शेकडो कमेंट्स देखील केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिले, ‘हे हत्तीचे पिल्लू खूप गोंडस आहे’ दुसऱ्याने लिहिले, ‘मी याचा आणखी एक व्हिडिओ पाहिला आहे, ज्यात हे पिल्लू त्याच्या आईला भेटतं.’ याशिवाय, बहुतेक युजर्स इमोजीज वापरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी जुना व्हिडिओ

दरम्यान, व्हायरल होणारा जुना व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता, त्यानंतर हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया पेजवर दिसला. त्या व्हिडिओमध्ये वन विभागाचे अनेक अधिकारी जंगलात दिसत होते. त्यांच्यासोबत एक हत्ती पिल्लूही चालत होतं. व्हिडिओमध्ये ते सर्व अधिकारी हत्तीच्या पिल्लाला मदत करत होते.

पाहा जुना व्हिडीओ:

खरंच, हे हृदयद्रावक आहे. या व्हिडिओमध्ये हत्तीचं पिल्लू खूप वेगाने धावत आहे. त्या व्हिडिओवर लोकांच्या बर्‍याच प्रतिक्रिया देखील दिसल्या. एकानं म्हटलं लिहिले – खूप गोंडस पिल्लू. वन अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे वन्य प्राणी जिवंत आहेत, अन्यथा शिकारी त्यांना कधीच मारतील? त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले – हा खरोखर एक चांगला व्हिडिओ आहे.

हेही पाहा:

Video: मांजरीच्या पिलाला रेल्वे ट्रॅकवरुन वाचवलं, लोक म्हणाले, अजून माणुसकी जिवंत आहे!

Video: भजन करणाऱ्या साधूंमध्ये कर्ताल वाजवणारं माकड, नेटकरी म्हणाले, हे तर हनुमानजी!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.