बापरे! हा माणूस गेल्या 62 वर्षांपासून एकदाही झोपला नाही; सत्य जाणून डॉक्टरांनाही बसला धक्का
एक असा शेतकरी जो गेल्या 62 वर्षांपासून झोपलेलाच नाही. हा माणूस तब्बल 62 वर्ष झोपलेला नाही. पण त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास झालेला नाही की आजारपण आलेलं नाही. त्याच्याबाबतचा हा प्रकार पाहून डॉक्टरही गोंधळात पडले.

सर्वांसाठी झोप ही किती महत्त्वाची असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. जर झोप पूर्ण झाली नाही तर अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. एक दिवसही झोप पूर्ण झाली नाही तर लगेच शरीराच्या तक्रारी, त्रास सुरु होतात. काम करण्यास सुचत नाही. अन्न-पाण्यासारखंच झोपही तेवढीच महत्त्वाची आहे. पण जर तुम्हाला म्हटलं की एक माणूस आहे जो तब्बल 62 वर्ष झोपलेला नाही तर. यावर कोणाचा विश्वास बसणं शक्य नाही. कारण एक किंवा दोन दिवस झोप नाही मिळाली तर माणूस आजारी पडतो पण हा माणूस तब्बल 62 वर्ष झोपलेला नाही. त्याची ही अडचण पाहून डॉक्टरही थक्क झाले होते.
हा शेतकरी गेल्या 62 वर्षांपासून झोपलेलाच नाही
शास्त्रज्ञांच्या मते मणसांसाठी श्वास घेण्याइतकीच झोपही महत्त्वाची असते. पण या माणसाच्याबाबतीत सगळंच उलट घडलं आहे. हा एक शेतकरी असून त्याचे नाव थाई न्गोक आहे आणि तो आता 81 वर्षांचा आहे. हा शेतकरी व्हिएतनामचा राहणारा रहिवासी आहेत. त्याच्यामागचं कारणही फार विचित्र आहे.
शेतकऱ्याच्या या आजारामुळे डॉक्टर गोंधळलेले आहेत.
यामगचं कारण म्हणजे न्गोक यांना आलेला ताप. त्यांनी दावा केला आहे की 1962 मध्ये त्यांना तीव्र ताप आला होता. तेव्हापासून ते गाढ झोपलेले नाहीत. ते डुलकीही घेत नाहीत किंवा गाढ झोप घेत नाहीत. न्गोक गेल्या 60 ते 62 वर्षांपासून केवळ जागेच नाहीत तर त्यांच्या शेतातही काम करत आहे. त्यांना कधीही कोणीही झोपलेलं कधीच पाहिलेलं नाही. याबाबत त्यांची पत्नी, मुले, मित्र तसेच त्यांच्या शेजाऱ्यांनी पुष्टी दिली आहे. दरम्यान त्यांच्या दुर्मिळ आजारामुळे डॉक्टर गोंधळलेले आहेत.
- A man named Thai Ngoc has not slept for 62 years
झोपण्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले पण…
वृत्तानुसार, व्हिएतनाममधील क्वांग नाम प्रांतातील एका छोट्या गावात 1942 मध्ये जन्मलेला न्गोक व्हिएतनाम युद्धादरम्यान वयाच्या 20 व्या वर्षी ते तीव्र तापाने आजारी पडले होते. काही दिवसांनी त्याचा ताप कमी झाला, पण त्याला पुन्हा झोप मात्र लागली नाही. न्गोकने म्हटलं की त्यांनी झोप येण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्याला झोप आली नाही. त्याने म्हटलं की, “झोपण्यासाठी मी औषध घेतलं, घरगुती उपचार करून पाहिले, झोपण्यासाठी दारूही प्यायलो, पण काहीही काम झाले नाही,” अखेर हा व्यक्ती आजपर्यंत झोपलेलाच नाहीये.
न्गोक यांच्या या गोष्टीवर विश्वास ठेवणं नक्कीच कठीण असलं तरी देखील ती सत्य कथा आहे. त्यामुळे जगात अशा कितीतरी आश्चर्य करणाऱ्या आणि थक्क करणाऱ्या गोष्टी असतात याचाही अंदाज येतो.
