VIDEO!’मराठी भेळवाला’ थेट ‘शिवतीर्थ’वर; राज ठाकरेंनी पत्नीसह घेतला मटकी भेळचा आस्वाद, भेळ खाऊन राज ठाकरे म्हणाले…
नवी मुंबईतील भेळवाला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे. एका मराठी भेळवाला थेट 'शिवतीर्थ'वर गेला. त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना भेळ खाऊ घातली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका भेळवाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तेही एका खास कारणासाठी. त्यामागे असणारं महत्त्वाचं कारण म्हणजे राज ठाकरे. होय, कारण हा भेळवाला थेट ‘शिवतीर्थ’वरच गेला. कारण त्याची राज ठाकरेंना एकदा तरी भेळ खाऊल घालण्याची मनापासून इच्छा होती. सागर गोरडे असं या भेळवाल्याचे नाव असून तो नवी मुंबईचा आहे. सागर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना भेळ खाऊ घालण्यासाठी थेट ‘शिवतीर्थ’ जाऊन पोहोचला. राज ठाकरेंना भेळ खाऊ घालण्याचे त्याचे खूप वर्षांचे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाल्याचं त्याने म्हटलं.
राज ठाकरेंच्या घरी कसा पोहोचला?
नवी मुंबईत प्रसिद्ध असलेल्या हा भेळवाला असा थेट राज ठाकरे यांच्या घरी कसा काय जाऊ शकतो असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर यामागे देखील एक कारण आहे ते म्हणजे शर्मिला ठाकरे यांना त्यांची मैत्रिण तथा अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सागर गोरडे यांनी बनवलेली ही भेळ एकदा खाण्याचा सल्ला दिला होता. तसेच शर्मिला यांनी असही म्हटलं की, सहा वर्षांपूर्वी त्यांनी ही भेळ खाल्ली होती. मात्र त्यानंतर त्यांच्या लक्षातून ही गोष्ट गेली होती.
राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी घेतला या खास भेळचा आस्वाद
पण जेव्हा सागरला संधी मिळाली तेव्हा तो स्वत: राज ठाकरेंच्या घरी त्यांना भेळ देण्यासाठी गेला. त्याचं राज ठाकरे आणि शर्मिला यांनी मनापासून स्वागत केलं. तेसच त्याच्याकडे मिळणारी ओली मटकी भेळ, सुकी मटकी भेळ अशा दोन्ही प्रकारच्या भेळचा आस्वादही घेतला. त्यानंतर भेळ खरोखरंच अप्रतिम असल्याचं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. एवढं नाही तर शर्मिला सागरला घरी काही कार्यक्रम असल्यास त्याला भेळसाठी बोलवण्याचे आश्वासनही दिले. त्या म्हणाल्या,” मी तुम्हाला आमच्या घरी एखाद्या कार्यक्रमासाठी नक्की बोलवेन, तेव्हा नक्की या” खरं तर असं बोलणं म्हणजे शर्मिला ठाकरे यांच्याकडून सागरला मिळालेलं हे कौतुकच होतं. राज ठाकरे यांनी देखील भेळ स्वादिष्ट असल्याची दाद दिली. त्यामुळे सागरला देखील नक्कीच खूप आनंद झाला.
View this post on Instagram
“ग्रेट भेट राजसाहेब ठाकरे….” सागरची पोस्ट
सागर गोरडेने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “ग्रेट भेट राजसाहेब ठाकरे, जेव्हा मी हा 10 वर्षांपूर्वी भेळचा छोटासा व्यावसाय चालू केला होता. तेव्हा मनात विचार आला होता की मी बनवलेली ओली मटकीभेळ, सुकी मटकीभेळ राजसाहेब ठाकरे यांना देऊ शकतो का? असा विचार केला. तो विचार आज पूर्ण झाला. खरंच आज शिवतीर्थ या निवासस्थानी राजसाहेबांना आणी वहिनीसाहेबांना भेटून अविस्मरणीय अनुभव आला. राजसाहेब आणि वहिनीसाहेब व संपूर्ण परिवाराने ओली मटकी भेळ, सुकी मटकी भेळ अशा दोन्ही प्रकारच्या भेळ खाऊन मनसोक्त भेळीचा आस्वाद घेतला.” अशी पोस्ट करत सागरने त्याचा आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे.
