भारतात ‘या’ ठिकाणी राहतात अनेक जादूगर, लहान मुलं एका मंत्राने करु शकतात सर्वकाही गायब
भारतातील एकाच ठिकाणी 2800 जादूगर त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात, वृद्ध व्यक्तीपासून लहान मुलांना माहितेय जादूचे खेळ.. लहान मुलं एका मंत्राने करु शकतात सर्वकाही गायब

90 च्या दशकातील काळ असा होता, जेव्हा मोबाईल, सोशल मीडिया असं काहीही नव्हतं. अशात कुठे जादूगर आला तर त्याची जादू पाहण्यासाठी फक्त लहान मुलांचीच नाही तर, मोठ्या व्यक्तींची देखील गर्दी जमयाची… त्यानंतर मुलांमध्ये एकच चर्चा असायची, जादूगरने ती जादू अशी केली असेल.. चाकू किंवा धार असलेल्या वस्तूने जादू केली तर, त्याला लागलं तर नसेल ना… सांगायचं झालं तर, 90 च्या दशकातील जादूच वेगळी होती… ती जादू आज फक्त आठवणींमध्ये राहिली आहे. आज ही कला आता लोप वापत आहे… पण आपल्या भारत देशात असा देखील एक भाग आहे, जेथे तब्बल 2800 जादूगर त्यांच्या कुटुंबियांसोबत एकत्र राहतात..
याठिकाणी 8 वर्षांच्या लहान मुलापासून ते तरुण आणि म्हाताऱ्यापर्यंत, सर्वजण छोटे-मोठे जादूचे कार्यक्रम करतात आणि हे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. काही लोक या भागाला कठपुतली कॉलनी म्हणून देखील ओळखतात. पण तुम्ही कदाचित देशाच्या कोणत्या कोपऱ्यात हा भाग आहे याचा विचार केला नसेल.
याभागाबद्दल सांगायचं झालं तर, हे ठिकाण दिल्लीच्या आनंद पर्वत आणि फरीदपुरी भागांच्या दरम्यान आहे. या भागाजवळ शादीपूर मेट्रो स्टेशन आहे, जे अंदाजे 20 – 25 मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे राहणारे अमित याठिकाणी गेल्या 9 वर्षांपासून राहत आहेत. तो स्वतः अनेक लहान-मोठ्या जादूच्या युक्त्या करतात आणि अभ्यासासोबतच ते नवीन जादूच्या युक्त्या देखील शिकत असल्याचं त्यांनीसांगितलं.
याभागात अनेक वेगवेगळ्या प्रकारते जादूचे खेळ होतात. एका 8 वर्षांमुलावर देखील जादू करण्यात आली. मुलाच्या मानेत लाकडाचं कवच टाकलं आणि दुसऱ्या बाजून तलवार बाहेर काढली… तो मुलगा देखील न घाबरता खेळाचा आनंद घेत होता. पण मुलाला कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही… येथील लहान मुलं देखील छोट्या – मोठ्या जादू करत असतात.
परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, ‘आजोबांकडून जादू शिकली आहे. त्यांच्या तीन पिढ्या जादू कशी करायची माहिती आहे… जादूमुळे लोकं स्वतःची आणि कुटुंबाची भूक भागवत आहेत. एवढंच नाही तर, या परिसरात फक्त जादूगारच नाही तर कठपुतळी वादक, अनेक ढोलकी वादक आणि इतर अनेक लहान-मोठे कलाकार आणि कौशल्य दाखवणारे लोक देखील एकत्र राहतात.
