Viral Video: कोंबडी पिल्लांना वाचवण्यासाठी नागाशी भिडली, चोच मारुन अक्षरश: केले हैराण
Viral Video: मुलांसाठी आई कोणत्याही थरला जाऊ शकते हे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी कोंबडी थेट नागाशी भिडली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

‘या जगातील सर्वात मोठा योद्धा आई आहे’ हा केजीएफ चित्रपटातील डायलॉग तुम्हाला आठवतो का? हा डायलॉग अगदी खरा आहे. आईच्या प्रेम आणि धैर्यापुढे जगातील कोणत्याही शक्ती टिकू शकत नाही. हेही खरे आहे की एक आई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काहीही करायला तयार असते. अगदी आपल्या जीवाचीही पर्वा न करता ती लढा देते. याचे जिवंत उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते. एक कोंबडी आपल्या पिल्ल्यांना वाचवण्यासाठी थेट नागाशी भिडली आहे. या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोंबडी आपल्या पिल्लांसोबत एका ठिकाणी उभी आहे. तिथे अचानक एक विषारी नाग येतो. तो कोंबडीच्या पिल्लांना शिकार बनवण्याचा विचार करुन तेथे आल्याचे दिसते. अशा परिस्थितीत आपल्या मुलांवर आलेले संकट पाहून कोंबडीने त्यांना वाचवण्यासाठी धाडसी कृत्य केले आहे. ज्याची कदाचित सापालाही अपेक्षा नव्हती. कोंबडी निर्भयपणे त्या विषारी नागावर तुटून पडली आहे. तिने आपल्या टोकदार चोचीने त्याच्यावर हल्ला केला आहे. कोंबडीच्या सततच्या हल्ल्याने नाग घाबरला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण कोंबडीने त्याचा पाठलाग सोडला नाही आणि सतत त्याच्यावर हल्ला करत राहिली.
Viral Video: तिसऱ्या मजल्यावरून धाडकन पडला, पण असा चमत्कार झाला की…अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पाहाच!
The descendant of dinosaurs…🐓 pic.twitter.com/jO1wFrDjrK
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) September 21, 2025
कोंबडीचे धैर्य पाहून लोक थक्क झाले
या हृदयस्पर्शी व्हिडीओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @TheeDarkCircle या आयडीवरून शेअर करण्यात आले आहे. कोंबडीचे धैर्य पाहून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ही डायनासोरची वंशज आहे.’ अवघ्या 28 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 70 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तसेच शेकडो लोकांनी व्हिडीओला लाइक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
व्हिडीओ पाहून एका युजरने लिहिले आहे की, ‘आई कोणत्याही रूपात असो, आपल्या मुलांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.’ तर दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे, ‘कोंबडीने सिद्ध केले की धैर्य हे आकारावर नव्हे, तर निश्चयावर अवलंबून असते.’ अनेक युजर्सनी तर कोंबडीला ‘मदर ऑफ द इअर’ हा पुरस्कारही दिला आहे.
