या काळातही असं निखळ, काळजीचं प्रेम कुठं पाहायला मिळतं..? त्याचं उत्तर म्हणजे…

सध्या भारतात एकीकडे श्रद्धा वालकरची हत्या होतेय आणि दुसरीकडे प्रेम किती ग्रेट आहे हे पती-पत्नीच्या या व्हिडीओतून पाहायला मिळते.

या काळातही असं निखळ, काळजीचं प्रेम कुठं पाहायला मिळतं..? त्याचं उत्तर म्हणजे...
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 6:33 PM

मुंबईः भारतात सध्या एकीकडे श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणामुळे प्रेम, नातीगोती अशा गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे कर्नाटकातील एका बसस्थानकावर पती-पत्नीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे लोकांनी प्रेम या गोष्टीला पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

सध्या सोशल मीडियामुळे कोणत्याचा गोष्टी लपून राहिल्या नाहीत. कधी भयंकर अपघात तर कधी माणुसकीचा गहिवर अशा अनेक प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियामुळे प्रचंड व्हायरल झाले आहेत. सध्या आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

त्या व्हिडीओला वेगवेगळे कॅप्शन देऊन अनेकांनी तो शेअरही केला आहे. तो व्हिडीओ आहे कर्नाटकातील एका बस स्थानकावरचा.

पती-पत्नीचं एक जोडपं आहे, आणि त्या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीची पत्नी आजारी असल्यामुळे ती त्याच्या मांडीवर झोपली आहे.

पत्नी आजारी असल्याने पती तिला प्रेमाने थोपटतानाही दिसून येत आहे. त्यामुळे प्रेमाचा हा अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

कर्नाटकातील बस स्थानकावरील व्हायरल झालेला या व्हिडीओमध्ये दोघं पती पत्नी बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर बसलेली दिसून येत आहे.

तर पतीने आजारी पत्नीला आपल्या मांडीवर तिचं डोकं ठेवून तो तिला प्रेमानं थोपटताना दिसून येत आहे. यावेळी पतीच्या चेहऱ्यावरही प्रचंड चिंता दिसून येते आहे.

त्यामुळे या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करताना त्यांच्या प्रेमाला कोणतीच उपमा नाही. हे प्रेम मिळणाऱ्या व्यक्तीला कोणी नशीबवान म्हटले आहे तर कोणी आजच्या काळातील हे ग्रेट प्रेम असल्याच्या प्रतिक्रिया त्यावर आल्या आहेत.

जिंदगी गुलजार है नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पुरुषाच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपलेली व्यक्ती ही महिला असल्याने अनेकांनी त्यांच्याबद्दल भावनिक अशा कमेंट केल्या आहेत.

आजारी पत्नीची काळजी घेणाऱ्या नवऱ्याच्या या व्हिडीओमुळे अनेकांनी त्यांच्या प्रेमाचे कौतूक केले आहे. हा व्हिडीओ 58, 000 हून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 4,800 लोकांनी तो आवडला असल्याचे सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.