AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: Zeptoच्या डिलिवरी बॉयनेच केली ग्राहकाला मारहाण, डोक्याला फ्रॅक्चर; नंतर कंपनीने…

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये झेप्टो डिलिवरी बॉय आणि ग्राहकामध्ये मारहाण झाल्याचे पाहायला मिळते.

Video: Zeptoच्या डिलिवरी बॉयनेच केली ग्राहकाला मारहाण, डोक्याला फ्रॅक्चर; नंतर कंपनीने...
Zepto Delivery BoyImage Credit source: Social Media
| Updated on: May 26, 2025 | 1:31 PM
Share

आजकाल अनेकजण घरबसल्या ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून घरातील राशन, खाद्यपदार्थ मागवताना दिसतात. बऱ्याचदा वेळ वाया जाऊ नये किंवा पटकन सामान मिळावे यासाठी या अॅपचा वापर केला जातो. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये घराच्या पत्त्यावरुन झालेल्या वादामुळे डिलिवरी बॉयने चक्क ग्राहकावर हात उचलला आहे. यावर त्या कंपनीने देखील प्रतिक्रिया दिला आहे.

ही घटना बेंगळुरू येथील जजेस कॉलनी, बसवेश्वरनगर येथे घडली आहे. एक 30 वर्षीय व्यापारी, शशांक एस. याने झेप्टो वरुन काही सामान मागवले होते. मात्र, डिलिव्हरी बॉय विष्णुवर्धनने रागाच्या भरात शशांकवर हल्ला केला आहे. हा वाद पत्त्याबाबतच्या गोंधळामुळे उद्भवला. या घटनेत शशांकच्या चेहऱ्याला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच त्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वाचा: नवरदेवाचे हात पाहिले अन् नवरीची सटकलीच, भर मंडपात घडवली जल्माची अद्दल; तुम्हीही व्हा सावध

नेमकं काय घडलं?

21 मे रोजी दुपारी, शशांकची पत्नी आणि वहिनीने झेप्टो या किराणा डिलिव्हरी अॅपद्वारे लोणी, शुद्ध तूप आणि चिप्स यासारख्या काही वस्तू मागवल्या. दुपारी 1:50 वाजता डिलिव्हरी बॉय विष्णुवर्धन त्यांच्या घरी पोहोचला. शशांकची वहिनी ऑर्डर घेण्यासाठी गेटवर गेली तेव्हा पत्त्याबाबत गोंधळामुळे विष्णुवर्धनने तिच्याशी उद्धटपणे वागण्यास सुरुवात केली. हा गोंधळ ऐकून शशांक गेटवर गेला. त्याने विष्णुवर्धनला वहिनीशी उद्धटपणे वागण्याबद्दल विचारणा केली, तेव्हा त्यांच्यात वाद वाढला. शशांकच्या मते, विष्णुवर्धनने शिवीगाळ केली आणि जेव्हा त्याने यावर आक्षेप घेतला, तेव्हा डिलिवरी बॉयने हल्ला केला.

गंभीर जखम आणि तक्रार

या हल्ल्यात शशांकच्या चेहऱ्याच्या कवटीला फ्रॅक्चर झाले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर अनुभव शेअर केला आहे. सोबतच सीटीव्ही फूटेजही दाखवले आहे. डॉक्टरांनी शशांकला सांगितले की, जर फ्रॅक्चर एका आठवड्यात बरे झाले नाही तर शस्त्रक्रिया करावी लागेल. शशांकने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे आणि या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना पुरवला आहे. फुटेजमध्ये शशांकने डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हला ढकलले आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला झाल्याचे दिसते. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 115, कलम 126, कलम 351 आणि कलम 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

झेप्टोचे उत्तर

शशांकच्या इन्स्टाग्राम पोस्टला प्रत्युत्तर देताना झेप्टोने खेद व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना या घटनेची माहिती आहे आणि ते याबाबत तपास करत आहेत. तसेच, त्यांनी शशांकला योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.