AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आफ्रिकन व्यक्तीने ‘डान्स मेरी राणी’वर केला हटके डान्स, व्हिडीओ लोकांच्या पसंतीला

हिंदी चित्रपटातील गाण्यांवर या दोघांची लिप्सिंग आणि डान्सचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सच्या पसंतीला चांगलेच उतरत आहेत. आता टांझानियाचा टिकटॉक स्टार किली पॉलचा अजून एक व्हिडीओ समोर आलाय.

आफ्रिकन व्यक्तीने 'डान्स मेरी राणी'वर केला हटके डान्स, व्हिडीओ लोकांच्या पसंतीला
Kili Poll dance on Dance meri Rani Song
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 11:10 AM
Share

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांची (Bollywood Film) गाणी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच आपल्या देशी बॉलिवूड गाण्यांवर विदेशी नागरिकही डान्स करताना दिसून येतात. टांझानियातील भावा-बहिणीची एक जोडी सध्या चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. हिंदी चित्रपटातील गाण्यांवर या दोघांची लिप्सिंग आणि डान्सचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडिया (Social Media) यूजर्सच्या पसंतीला चांगलेच उतरत आहेत. आता टांझानियाचा टिकटॉक स्टार किली पॉलचा (Kili Paul) अजून एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये ते ‘डान्स मेरी राणी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

आपण टांझानियाचे टिकटॉक स्टार किली पॉल आणि नीमा यांच्याबद्दल बोलत आहोत. आफ्रिकेतील या भावा-बहिणीने अजून एक व्हिडीओ रिलिज केलाय. या व्हिडीओमध्ये हे दोघे आदिवासी पेहराव करुन डान्स मेरी राणी या गाण्यावर शानदार स्टेप करताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर त्यांचा हा डान्स परफॉर्मन्स जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

हा व्हिडीओ किली पॉलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसंच आपण जो व्हिडीओ पाहिला तो अभिनेत्री नोरा फतेहीनेही आपल्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 9 लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्ती या व्हिडीओचं कोतुक करत आहे. या दोघांनी नुकताच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा चित्रपट शेरशाहमधील गाणं रातां लम्बियावर लिपसिंक केलं होतं. हा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर ही जोडी इंटरनेटवर चांगलीच गाजत आहे. आता त्यांचा नवा व्हिडीओही समोर आला असून तो लोकांचा पसंतीला उतरत आहे.

सध्या गुरु रंधावाचे डान्स मेरी राणी हे गाणे लोकांच्या पसंतीला उतरत आहे. सोशल मीडियावरही #dancemerirani नावाने ट्रेंड सुरु आहे. लोक या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहेत. तर इन्स्टाग्रामवरही फक्त या ट्रॅकवर व्हिडीओचा पाऊस पडताना दिसत आहे. सर्वसामान्य लोक ते सेलेब्रिटी लोकांपर्यंत या ट्रेन्डचा हिस्सा बनत आहेत. या गाण्याच्या हुक स्टेपला फॉलो करत रील व्हिडीओ शेअर करत आहेत. या किली पॉलही या ट्रेन्डचा भाग बनले आहेत.

इतर बातम्या : 

Happy Birthday Salman Khan | ‘मैंने प्यार किया’ ते ‘अंतिम’, आजवरच्या कारकिर्दीत सलमान खानमध्ये झाले अनेक बदल!

Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.