AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 बायका, 102 मुलं, 568 नातवंडांनंतर अखेर त्याला आली अक्कल; घेतला ‘हा’ निर्णय

12 बायकांसोबत एकाच छताखाली राहणारा शेतकरी; भल्यामोठ्या कुटुंबाविषयी वाचून तुम्हालाही बसणार धक्का!

12 बायका, 102 मुलं, 568 नातवंडांनंतर अखेर त्याला आली अक्कल; घेतला 'हा' निर्णय
12 बायका, 102 मुलं, 568 नातवंडांनंतर अखेर त्याला आली अक्कल; घेतला 'हा' निर्णय Image Credit source: Twitter
| Updated on: Dec 29, 2022 | 1:40 PM
Share

युगांडा: आपल्या देशात वाढती लोकसंख्या हा केवळ सामाजिकच नाही तर राजकीय मुद्दाही बनला आहे. यावर दररोज चर्चा होत असते. मात्र आफ्रिकेतील एका व्यक्तीच्या भल्यामोठ्या कुटुंबाविषयी वाचून तुम्हाला धक्काच बसेल. या व्यक्तीच्या एक, दोन नाही तर 12 पत्नी आहेत. या 12 बायकांपासून त्याला तब्बल 102 मुलं आहेत. या व्यक्तीच्या नातवंडांचा आकडा वाचून तुमचे डोळेच विस्फारतील. 12 बायका, 102 मुलं आणि 568 नातवंडांनंतर अखेर त्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 102 मुलांचं संगोपन करणारी ही व्यक्ती पेशाने शेतकरी आहे.

युगांडामधील या शेतकऱ्याचं नाव आहे मुसा हसाह्या. मुसा यांच्या भल्यामोठ्या कुटुंबाची चर्चा जगभरात आहे. इतक्या मोठ्या परिवारानंतर त्यांनी अखेर त्यांच्या सर्व पत्नींना गर्भनिरोधक गोळ्या वापरण्यास सांगितलं आहे. मुसा हे 67 वर्षांचे आहेत. कुटुंबाच्या पालनपोषणसाठी समस्या येत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

“राहणीमानाचा खर्च वाढत असल्याने माझं उत्पन्न कुटुंबासाठी कमी पडतंय. माझं कुटुंब आता इतकं मोठं झालंय की त्या सर्वांचं पालनपोषण माझ्या उत्पन्नात होऊ शकणार नाही, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे”, असं मुसा म्हणाले.

मुसा हे युगांडातील लुसाका शहरात राहतात आणि तिथे एकापेक्षा अधिक महिलांशी लग्न करणं कायद्याने गुन्हा नाही. याच कारणामुळे ते एकानंतर एक लग्न करत गेले आणि आता त्यांच्या एकूण 12 पत्नी आहेत. “फक्त एकाच महिलेसोबत पुरुष कसा काय समाधानी असू शकतो”, असा सवाल त्यांनी याविषयी बोलताना केला.

विशेष म्हणजे मुसा यांच्या बाराही बायका एकाच घरात राहतात. जेणेकरून त्या सर्वांवर लक्ष ठेवता येईल, यासाठी त्या सगळ्यांना सोबत ठेवण्याचा निर्णय मुसा यांनी घेतला. त्यांची सर्वांत छोटी पत्नी जुलैका हिला 11 मुलं आहेत. तर त्यांची एक तृतीयांश मुलं ही 6 ते 51 वर्षांदरम्यानची आहेत. ही सर्व मुलं त्यांच्यासोबत मिळून शेतात काम करतात.

मुसा यांचा सर्वांत मोठा मुलगा हा 11 व्या पत्नीपेक्षा 21 वर्षांनी मोठा आहे. गरीबीमुळे मुसा यांच्या दोन पत्नी त्यांना सोडून गेल्या आहेत. तर इतर बायकांनी आता गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लुसाका शहरात कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा वापर करणं योग्य मानलं जात नाही.

Follow Us
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...