AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोपल्यानंतर ती आपले अर्धे आयुष्यच विसरून गेली, कुठे घडली ही अजब घटना

ही महिला झोपल्यानंतर एका झटक्यात आपले अर्धे आयुष्य विसरून आपल्या अल्लड वयात पोहचली आहे, कुठे घडली आहे ही अजब गजब घटना

झोपल्यानंतर ती आपले अर्धे आयुष्यच विसरून गेली, कुठे घडली ही अजब घटना
MEMORYImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 16, 2023 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली : मानवी शरीर एक अजब यंत्र आहे. ते मजबूत असण्याबरोबरच गुंतागूंतीचेही आहे. त्यामुळे कधी काय होईल हे सांगू शकत नाही. काही वेळा मानवी शरीरात अशा समस्या निर्माण होतात की आपण आश्चर्यचकीत झाल्यावाचून रहात नाही. आता अशीच घटना एका महिलेबाबत घडली आहे. ही महिला झोपल्यानंतर एका झटक्यात आपले अर्धे आयुष्य विसरून आपल्या अल्लड वयात पोहचली आहे, कुठे घडली आहे ही अजब गजब घटना ते पाहूया…

आपण कधी विचार केला आहे की एखादी महिला झोपण्यापूर्वी 32 वर्षांची प्रोढ महिला असेल आणि तिच महिला झोपेतून उठल्यावर चक्क अल्लड सतरा वयाची टीनेजर बनून आपले अर्धे आयुष्यच विसरेल.. ही कुठल्या चित्रपटाची कहाणी नसून सत्य घटना आहे. ही घटना कॅनडाच्या टोरंटो येथे घडली आहे. तेथील 32 वर्षांची नेल्श हिच्याबाबतीत हे आक्रीत घडले आहे. तिला एकदा अशी गाढ झोप लागली की झोपेतून उटल्यावर तिचे वयच ती विसरली आणि एकदम सतरा वयाच्या टप्प्यावर जाऊन पोहचली.

‘द मिरर’ यात प्रकाशित वृत्तात म्हटले आहे की नेल्श या महिलेला आपले अर्धे आयुष्य आता आठवतच नाही. ती आता सोळा ते सतरा वर्षांची असल्याचे समजू लागली आहे, तिला सहा वर्षांची मुलगी आहे हे देखील ती विसरली आहे, इतकेच काय तिचे लग्न झाल्याचेही तिला आता आठवत नाही, त्यामुळे ती आता नवऱ्याला विसरून आपल्या बॉयफ्रेंडला शोधत आहे. त्यामुळे स्वत:च्या मुलीला विसरून गेली आहे.

नेल्श हीच्यावर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले की तिला घरातील लोक जेव्हा रूग्णालयात घेऊन आले तेव्हा ती खूपच गोंधळलेली होती. दोन ते तीन दिवस निरीक्षण आणि काही चाचण्या केल्यानंतर तिच्या विस्मृतीच्या आजाराचा पत्ता लागला. कुटुंबियांशी बोलल्यानंतर आणि मेडीकल रिपोर्टमध्ये एक वेगळी माहीती समोर आली. ती नऊ वर्षांची असताना एक वेगळी घटना तिच्यासोबत घडली होती. त्यामुळे तिच्या डोक्याला जखम झाली होती. त्यामुळे कदाचित तिची स्मृती गायब झाली असेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यानंतर तिच्या पतीने तिला सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Nesh Pillay (@pillay.nesh)

पुन्हा पतीशी विवाह केला

आपल्या पत्नीची गेलेली स्मृती परत आणण्याचा प्रयत्न तिचा पती करीत आहे, या दरम्यान ती पुन्हा आपल्या पतीच्या प्रेमात पडली आहे. ती भले तिचे पूर्वाआयुष्य विसरली असली तरी तिच्या पतीला आता ती तिचा प्रियकर समजत पुन्हा त्याच्याच प्रेमात पडली आहे. गेल्या 20 जानेवारीला तिने पुन्हा तिच्या पतीशी विवाह केला आहे. अजूनही तिला तिचे पुर्वायुष्यच आठवत नसल्याने आता घरचेही तिला सहकार्य करीत आहेत. तिचे डोके दुखत असते. तसेच तिला उलट्याही होत आहेत. परंतू घरातील मंडळी तिला या आजारातून बाहेर येण्यासाठी मदत करीत आहेत. एक अनोखी ही कहाणी सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.