AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती घाणेरडी कमेंट वाचून..; प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय, सांगितलं खरं कारण

प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्रीने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून गौतमी कपूर आहे.

ती घाणेरडी कमेंट वाचून..; प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय, सांगितलं खरं कारण
Gautami KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 22, 2026 | 8:44 AM
Share

प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री गौतमी कपूर सध्या सोशल मीडियापासून दूर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तिने इन्स्टाग्रामवर काहीच पोस्ट केलेलं नाही. आता खुद्द गौतमीने सोशल मीडियापासून दूर राहण्यामागचं कारण सांगितलं आहे. सतत आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट्सचा वैतागून तिने हा निर्णय घेतल्याचा खुलासा केला आहे. सकाळी उठताच जेव्हा ती फोन हातात घ्यायची, तेव्हा तिला सर्वांत आधी नकारात्मक कमेंट्सच वाचायला मिळायचे. यामुळे तिने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे गौतमी म्हणाली की, ती सध्या आयुष्याच्या आणि करिअरच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे तिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती तिच्या कुटुंबासोबत आणि काही जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत खुश आहे.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पुढे म्हणाली, “मला सध्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. पण जेव्हा माझ्या जवळच्या व्यक्तींबद्दलही चुकीचं आणि काहीही लिहिलं जाऊ लागलं, तेव्हा मात्र मला सोशल मीडियापासून लांब राहावंसं वाटलं. इन्स्टाग्रामपासून दूर राहिल्यानंतर मला बराच वेळ मिळू लागला आणि मनसुद्धा शांत राहू लागलं. एके दिवशी सकाळी उठल्यावर जेव्हा मी माझेच रील्स पाहिले तेव्हा त्यावर एक घाणेरडी आणि आक्षेपार्ह कमेंट होती. ती कमेंट इतकी घाणेरडी होती की माझा संपूर्ण दिवस वाईट गेला. अशा प्रकारची नकारात्मकता मला अजिबात झेलायची नाही, त्यासाठी मी पात्रही नाही. तेव्हापासूनच मी सोशल मीडियापासून चार हात लांब राहायचं ठरवलं. पण कामाचं काही असेल तर कदाचित मी पुन्हा सोशल मीडियावर परत येईन.”

गौतमी कपूर ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेता राम कपूरची पत्नी आहे. 2003 मध्ये या दोघांनी लग्न केलं. ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतून राम घराघरात पोहोचला. तर गौतमीनेही टीव्ही इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय. ‘घर एक मंदिर’ या मालिकेत काम करताना गौतमीला प्रतिदिन 5000 रुपये मानधन मिळत होतं. तर रामला प्रतिदिन 1500 रुपये मिळत होतं. म्हणजेच त्यावेळी ती पतीपेक्षा तिप्पट कमवत होती.

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.