स्ट्रीट फूड चालकाचं भन्नाट सर्व्हिंग, एक टॉस आणि खाद्यपदार्थ थेट ग्राहकाच्या प्लेटमध्ये, पाहा भन्नाट Video

स्ट्रीट फूड चालवणारे हे कुठल्याही शेफपेक्षा कमी नसतात. त्यांची सर्व करण्याची शैलीही इतर लोकांपेक्षा खूप वेगळी असते. आता अशाच एका रस्त्यावरील विक्रेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे

स्ट्रीट फूड चालकाचं भन्नाट सर्व्हिंग, एक टॉस आणि खाद्यपदार्थ थेट ग्राहकाच्या प्लेटमध्ये, पाहा भन्नाट Video
स्ट्रीट फूड चालकाचं भन्नाट सर्व्हिंग स्कील
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 11:56 AM

तुम्ही जगातील मोठ्यात मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जा, पण जी मजा रस्त्यावरच्या म्हणजे स्ट्रीट फूडला आहे, ती मजा कशात नाही. वडापाव असो, वा भजी वा इतर काही याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. कारण, या चवीत एक देसीपण असते, जे कशातच येऊ शकत नाही. याच पदार्थांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतात. आणि ते नेटकऱ्यांना आवडतातही. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात स्ट्रीटफूड चालक ग्राहकाला अनोख्या पद्धतीने सर्व करत आहे.

स्ट्रीट फूड चालवणारे हे कुठल्याही शेफपेक्षा कमी नसतात. त्यांची सर्व करण्याची शैलीही इतर लोकांपेक्षा खूप वेगळी असते. आता अशाच एका रस्त्यावरील विक्रेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीने आपल्या टॉसिंग कौशल्याने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, हा माणूस रस्त्याच्या कडेला गॅसवर काहीतरी शिजवत आहे. रस्त्याच्या पलीकडे दुसरी व्यक्ती प्लेट घेऊन उभी आहे आणि तितक्यात एक गाडी येते आणि तेवढ्यात आचारी गॅस बंद करतो आणि पॅन उचलतो, तव्यातील बीन्स इतक्या ताकदीने आणि अचूकतेने फेकतो की. तो सरळ रस्त्याच्या पलीकडे जातात आणि उभ्या असलेल्या तरुणाच्या भांड्यात जाऊन पडतात.

हा व्हिडीओ पाहा

@beutefullplacee या इंस्टाग्राम हँडलवरून हा भन्नाट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले की, ‘सर मला माझे जेवण मिळेल?’.

ही क्लिप पाहिल्यानंतर अनेकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. एका यूजरने लिहिले की, ‘या व्यक्तीची कला आहे की टायमिंग, मी गोंधळलो आहे, भाऊ.’ तर दुसऱ्या यूजरने हे आश्चर्यकारक असल्याचं सांगितलं. याशिवाय इतर अनेक युजर्सनी त्या व्यक्तीचे कौतुक केले.

हेही वाचा:

ऐकावं ते नवलच ! ओडिशात 63 कोंबड्यांना हार्ट अटॅक, लग्नाची वरात, मृत्यू दारात, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

अत्यंत दुर्मिळ अशा पांढऱ्या हरणाचे फोटो व्हायरल, लोक म्हणाले, याला वाचवा, नाहीतर काही खरं नाही!