
अमेझॉनचा सर्वात मोठा सेल हा प्राइम सदस्यांसाठी सुरू होणार आहे. 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना स्वस्त दरात स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप सारख्या हजारो प्रोडक्टची खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. अशातच हा सेल सुरू होण्यापूर्वी ग्राहकांसाठी उत्तम डील जाहीर करण्यात आल्या आहेत, जर तुम्ही देखील नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अमेझॉन प्राइम डे सेलमध्ये उपलब्ध असलेल्या तीन सर्वोत्तम डीलबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…
iPhone 15: अमेझॉनच्या अधिकृत साईटवर येणाऱ्या सेलसाठी एक वेगळे पेज तयार करण्यात आले आहे आणि या पेजवर काही उत्तम डीलच्या ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. आयफोन 15 चा 128 जीबी व्हेरिएंट बँक ऑफर्सनंतर 57,249 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध केला आहे. सध्या हा फोन 60,200 रुपयांना विकला जात आहे, म्हणजेच 2951 रुपयांची बचत होत आहे.
iQOO Neo 10R 5G: या iQOO स्मार्टफोनचा 8/128 GB व्हेरिएंट सध्या 26,999 रुपयांना विकला जात आहे. परंतु अमेझॉन सेल दरम्यान हा फोन डिस्काउंटनंतर 23,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
सॅमसंग ब्रँडच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा 12/256 GB व्हेरिएंट सध्या 87,000 रुपयांना विकला जात आहे परंतु या सेल दरम्यान तुम्हाला हाच स्मार्टफोन 74,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याचा अर्थ असा की सेल दरम्यान तुम्हाला हा फोन 12,001 रुपयांना स्वस्त मिळेल.
तर या सेल मध्ये प्रोडक्ट सवलतींव्यतिरिक्त, जर तुम्हाला अतिरिक्त बचत करायची असेल, तर या सेलसाठी Amazon ने ICICI आणि SBI बँकेशी हातमिळवणी केली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखादे इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करताना ICICI किंवा SBI बँक कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला अतिरिक्त 10 टक्के बचत करण्याची संधी मिळेल. प्रोडक्ट सवलती आणि बँक कार्ड सवलतींव्यतिरिक्त, तुम्हाला जुने फोन एक्सचेंज करण्यावर अतिरिक्त सवलतीचा फायदा मिळेल. याशिवाय, ग्राहकांसाठी व्याजमुक्त EMI ची सुविधा देखील आहे.