AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाच्या बाथरूममध्ये बनवायचा तरुणींचे अश्लील व्हिडीओ, टॉयलेटच्या सीटवरच…; पोलीसही हादरले

American Airlines: अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट अटेंडंट एस्टेस कार्टर थॉम्पसनने फ्लाइट दरम्यान अल्पवयीन मुलींचे गुप्त व्हिडिओ काढले. या गुन्ह्यामुळे त्याला 20 वर्षाची शिक्षा देण्यात आली होती. त्याला टॉयलेटच्या सीटखाली त्याचा आयफोन सापडला.

विमानाच्या बाथरूममध्ये बनवायचा तरुणींचे अश्लील व्हिडीओ, टॉयलेटच्या सीटवरच...; पोलीसही हादरले
planeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 10, 2025 | 6:27 PM
Share

आजकाल मोबाईलचा वापर आपल्या दैनंदिन दिनचार्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. मोबाईलमध्ये असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यामुळे आपला विरंगुळा होतो. मात्र आजकल अनेकजण मोबाईलचा चुकिच्या गोष्टींसाठी वापर करत आहे. अनेकजण लोकांचे अश्र्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात ज्यामुळे त्यांची बदनामी होते. असाच प्रकार एका अनेरिकन एअरलाईन्समध्ये घडला आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या एका फ्लाइट अटेंडंटने विमानाच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलींचे गुप्तपणे व्हिडिओ बनवले. यासाठी त्याने त्याचा फोन बाथरूमच्या सीटला चिकटवला होता.

सादर घटना 2023 मध्ये एका अमेरिकन एअरलाइन्समध्ये घडली होती. या घटनेमध्ये एका 14 वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ विमान उड्डाणादरम्यान रेकॉर्डिंग करण्यासाठी ओरोपीने त्याचा आयफोन टॉयलेट सीटला चिकटवला. या आरोपीचे नाव कार्टर थॉम्पसन असे होते. या व्हिडिओ बद्दल समजल्यानंतर कार्टर थॉम्पसनला बाल शोषणाचा दोषी ठरवण्यात आले होते. पोलिस तपासामध्ये असे दिसून आले होते की, कार्टर थॉम्पसनने यापूर्वी देखील मुलींचे असे अश्र्लील व्हिडिओज काढले होते. त्यामधील एक मुलगी फक्त 7 वर्षांची होती. कारटरने पीडितांना टॉयलेटचे सीट तुटल्याते भासवून तिथे त्याचा आयफोन स्टिकरखाली लपवला ज्यामुळे त्या मुलींचे व्हिडिओज रेकॉर्ड होतील.

बाथरूममध्ये क्लिप्स सापडल्या

उत्तर कॅरोलिना येथील शार्लोट येथील 37 वर्षीय व्यक्ती, ज्याला 20 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गुरुवारी पोलिसांना त्याच्या घरी गुप्त रेकॉर्डिंग आणि लहान मुलींचे अश्लील व्हिडिओ सापडले त्यानंतर पोलिसांनी ते व्हिडिओज न्यायालयात हजर झाले. आरोपीच्या आयक्लॉड अकाउंटमध्ये 7,9,11 आणि 14 वयोगटातील मुलींच्या गुप्त बाथरूम क्लिप्स सापडल्या होत्या, त्या सर्व 2023 मध्ये अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये चित्रित केल्या गेल्या होत्या. तपास करण्याच्या पोलिसांच्या टिमला असेही आढळून आले की आरोपींनी एआय-जनरेटेड चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ देखील गोळा केले होते. काही धक्कादायक फोटोंमध्ये एका आरोपी फ्लाइट अटेंडंटने टॉयलेट सीट तुटल्याचे भासवले आणि सीट कव्हरखाली फोन चिकटवण्यासाठी अलर्ट स्टिकर्सचा वापर केला.

सीट तुटलेली आहे…

एका फोटोमध्ये “सीट तुटलेली आहे” असे लिहिलेल्या स्टिकरखालून आयफोनचा फ्लॅशलाइट कॅमेऱ्याकडे चमकत असल्याचे दिसून आले आहे. बोस्टनच्या वकिलांनी सांगितले की, थॉम्पसनला अखेर सप्टेंबर 2023 मध्ये शहराकडे जाणाऱ्या विमानात पकडण्यात आले. मुख्य केबिन बाथरूममध्ये गर्दी असताना आरोपीने प्रथम १४ वर्षांच्या मुलीला प्रथम श्रेणीच्या बाथरूममध्ये नेले आणि तिला विचारले की तो आधी हात धुण्यासाठी आत जाऊ शकतो का. त्यानंतर फ्लाइट अटेंडंटने तिला शांतपणे सांगितले की टॉयलेट सीट “तुटलेली” आहे. पण मुलीला लवकरच लक्षात आले की थॉम्पसनने लाल देखभाल स्टिकर्सच्या मागे फोन लपवण्याचा प्रयत्न केला होता आणि फोटो काढले होते. मग ती तिच्या जागेवर परतली आणि ती तिच्या पालकांना दाखवली.

तिच्या वडिलांचा थॉम्पसनशी वाद झाला, त्यानंतर थॉम्पसन टॉयलेटमध्ये जाऊन लपला, स्वतःला आत लॉक केले आणि त्याचा फोन फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट केला, असे वकिलांनी सांगितले. जेणेकरून फोनमधून सर्व जुन्या गोष्टी डिलीट होतील. तपास सुरू केल्यानंतर, पोलिसांना आरोपीच्या सुटकेसमध्ये अधिक देखभालीचे स्टिकर्स आणि त्याच्या आयक्लॉडवर अश्लील व्हिडिओ आणि इतर गुप्त रेकॉर्डिंग्ज आढळले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.