AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंद महिंद्रा यांनी दिली महत्त्वाची शिकवण,”प्रत्येक दिवस कसा असावा” व्हिडीओ शेअर करत सांगितलं

आनंद महिंद्रा दररोज आपल्या ट्विटर हँडलवर आपल्या फॉलोअर्ससाठी मोटिव्हेशनल स्टोरी पोस्ट करतात. यावेळीही असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही प्रेरित व्हाल.

आनंद महिंद्रा यांनी दिली महत्त्वाची शिकवण,प्रत्येक दिवस कसा असावा व्हिडीओ शेअर करत सांगितलं
anand mahindra shared postImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 22, 2023 | 12:38 PM
Share

महिंद्रा अँड महिंद्राचे कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा एक यशस्वी व्यावसायिक आहेत. ते लोकांना प्रेरित करण्याचे काम करतात. आनंद महिंद्रा दररोज आपल्या ट्विटर हँडलवर आपल्या फॉलोअर्ससाठी मोटिव्हेशनल स्टोरी पोस्ट करतात. यावेळीही असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही प्रेरित व्हाल आणि आयुष्यातील प्रत्येक मौल्यवान क्षणाची कदर करायला शिकाल. “बाज की नजर रखो” असं तुम्ही अनेकांना म्हणताना ऐकलं असेल. खरं तर गरुडाचे डोळे अतिशय तीक्ष्ण, इतके तीक्ष्ण असतात की ते आकाशातून सहजपणे आपली शिकार पाहतात आणि जमिनीवर येऊन त्यांना पकडून आकाशात जातात. त्यामुळे त्यांना धोकादायक शिकारी पक्षी मानले जाते, ज्यांची ताकद आणि डोळे सगळ्यांनाच दिसतात. सध्या समोर आलेला व्हिडिओ थोडा आश्चर्यचकित करणारा आणि वेगळा आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस कसलाही विचार न करता नदीत पोहातोय. त्याच्यावर कुठल्या प्रकारचं संकट येऊ शकतं हेही त्याच्या ध्यानी मनी नाही.

आनंदाने पोहत असताना या दरम्यान त्याच्या पाठीमागून एक गरुड येतो. तो हल्ला करण्यासाठी त्या माणसाच्या वर फिरू लागतो. ती व्यक्ती पोहताना पाण्याच्या पृष्ठभागावर येताच गरुड आपल्या धारदार चोचीने हल्ला करण्याचा विचार येतो. परंतु अचानक त्याचे काय होते माहित नाही आणि तो त्या माणसाला इजा न पोहोचवता परत येतो.

हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं आहे की, ‘आपल्याला नॉर्मल वाटणाऱ्या प्रत्येक दिवसाबद्दल आपण कृतज्ञ असायला हवं..! हा व्हिडिओ नऊ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर कमेंट्स दिल्या जात आहेत.

एका युजरने लिहिले की, ‘देवाकडून येणारा प्रत्येक क्षण खरोखरच मौल्यवान आहे,’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘आयुष्यातील प्रत्येक दिवस संधी म्हणून घेतला पाहिजे. तो वाया जाऊ नये.’

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.