मुंग्याही देतात दूध! वाचा या छोट्या जीवांचा मोठा चमत्कार
मुंग्या या छोटेसे आणि शिस्तबद्ध जीव असतात. पण त्यांच्याबद्दल एक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुंग्याही दूध देतात! होय, अगदी इतर प्राण्यांप्रमाणे मुंग्या एक खास द्रव तयार करतात. चला, जाणून घेऊया या अनोख्या दुधाचे रहस्य.

मुंग्या म्हणजे छोट्या छोट्या पण अतिशय शिस्तबद्ध जीव. मात्र त्यांच्या आयुष्यातलं एक गुपित ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल, मुंग्याही दूध देतात! होय, वैज्ञानिक संशोधनातून हे समोर आलं आहे की, मुंग्या त्यांच्या विकासाच्या एका टप्प्यावर खास प्रकारचा द्रव तयार करतात, जो दूधासारखा पोषक असतो.
प्रौढ होण्याआधी, मुंग्या प्यूपा अवस्थेत असतात. याच अवस्थेत त्या त्यांच्या शरीरातून एक पोषक द्रव बाहेर सोडतात. या द्रवामध्ये अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, साखर आणि इतर महत्त्वाचे घटक असतात. हा द्रव केवळ त्यांची पिल्लंच नव्हे तर संपूर्ण वसाहत एकत्रितपणे वापरते. म्हणजेच प्रौढ मुंग्याही हे दूध पितात.
वैज्ञानिकांनी पाहिलं की जर प्यूपा वसाहतीपासून वेगळे केले गेले, तर त्यांच्या शरीरातून हा द्रव बाहेर पडतो. वसाहतीतील इतर मुंग्या हा द्रव पीत असल्याने प्यूपाला साठलेलं द्रव कमी होतं आणि त्यांचा जीव वाचतो. त्यामुळे हे दूध फक्त पोषणासाठी नाही तर वाचवण्यासाठीही महत्वाचं ठरतं.
काय आहे वैज्ञानिक कारण
मुंग्यांचं हे ‘दूध’ आपल्याला निसर्गाच्या अद्भुततेची जाणीव करून देतं. इतक्या छोट्या जीवांमध्येही एकमेकांसाठी प्रेम, सहकार्य आणि परस्परावलंबन किती महत्वाचं आहे, हे यातून दिसून येतं. त्यांच्या जीवनशैलीतून माणसांनीदेखील एकत्र राहण्याचा आणि एकमेकांना मदत करण्याचा प्रेरणादायक संदेश घ्यायला हवा.
वास्तविक, काही प्रजातींच्या मुंग्या त्यांच्या अळ्यांच्या (larvae) शरीरातून एक विशिष्ट पोषक द्रव तयार करतात. या अळ्या त्यांच्या शरीरातून एक गोडसर, पोषणमूल्यांनी भरलेलं स्त्राव (secretion) निर्माण करतात, जो इतर प्रौढ मुंग्या आणि काही वेळा राणी मुंगीही ग्रहण करतात. वैज्ञानिकांनी याला “ट्रॉफॉलॅक्सिससारखा द्रव” किंवा “अळ्यांचं दूध” असं म्हटलं आहे.
हा द्रव मुंगीच्या वसाहतीत पोषण साखळीचा भाग असतो आणि सर्व मुंग्या याचा उपयोग अन्न म्हणून करतात. म्हणजेच, जरी हे सामान्य दुधासारखं नसलं, तरी त्याचं कार्य “दूधासारखं” म्हणजेच पोषण देणारं असतं. हा शोध Nature या प्रसिद्ध वैज्ञानिक जर्नलमध्ये 2022 मध्ये प्रसिद्ध झाला होता आणि त्यानंतर यावर बरीच चर्चा झाली होती.
