यूट्यूबर अरमान मलिक इंटरनेट जगतात खूप लोकप्रिय आहे. अरमानचे दोनवेळा लग्न झाले आहे. त्याच्या दोन्ही पत्नी एकाच घरात एकत्र राहतात. अरमान त्याच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या दोन्ही पत्नींसोबत व्लॉग शेअर करतो. अरमान अनेकदा आपल्या पर्सनल लाइफच्या चर्चेत असतो. आता परत एकदा अरमान चांगलाच चर्चेत आलाय. सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे.
युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अरमान मलिकच्या दोन पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक याही कंटेंट क्रिएटर आहेत. अरमानला पत्नी पायलसोबत एक मुलगाही आहे.
आता अरमानच्या दोन्ही पत्नी एकत्र गरोदर राहिल्या आहेत. अरमानने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर दोन्ही पत्नींच्या गरोदरपणाची घोषणा केली. अरमानच्या दोन बायका बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. अरमानने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे- “माझे कुटुंब.”
अरमानची पोस्ट समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी अरमानचं अभिनंदन करतंय, तर कुणी त्या दोघीही एकाच वेळी प्रेग्नंट असल्यामुळे अरमानला ट्रोल करतायत.
अरमानच्या दोन बायका एकत्र गर्भवती कशा होऊ शकतात, याचा अनेकांना धक्का बसला आहे. लोक अरमानची खिल्ली उडवत आहेत.
एका यूजरने आश्चर्याने विचारले – “दोघेही एकाच वेळी प्रेग्नंट झाले आहेत का?” आणखी एका युझरने लिहिले – “मला आश्चर्य वाटते… दोघेही एकत्र गर्भवती कसे होऊ शकतात?”
View this post on Instagram
त्याचबरोबर अरमान आपल्या पहिल्या पत्नीवर कमी आणि दुसऱ्या पत्नीवर जास्त प्रेम करतो, असा अनेकांचा समज आहे.
लोक म्हणतात की अरमान आपल्या दुसऱ्या पत्नीला पहिल्या पत्नीला अधिक महत्त्व देतो आणि तिच्यासोबत बरेचसे फोटो शेअर करतो. अरमान मलिकच्या या पोस्टला आतापर्यंत 1.47 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
अरमान मलिक हा एक लोकप्रिय यूट्यूबर आहे, तो अनेकदा यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर मनोरंजक व्हिडिओ शेअर करतो रिपोर्ट्सनुसार, अरमानने 2011 साली पायलसोबत लग्न केले होते. यानंतर 2018 साली त्याने पत्नीची बेस्ट फ्रेंड कृतिकाशी लग्न केलं. .