Baba Vanga Prediction : ग्रहांचे संकेत, युद्धाचे नगारे, बाबा वेंगाची वाचली का ती भविष्यवाणी, विनाशाचा काळ आला जवळ?
सध्या ग्रहताऱ्यांची जी स्थिती आहे आणि भविष्यवेत्ती बाबा वेंगाने जी भाकीतं नोंदवली आहे, त्यावरून येणारा काळ मानव जातीसाठी विनाशकारी असल्याचा दावा करण्यात येत आहे. जगावर तिसऱ्या विश्व युद्धाचे ढग गडद होत आहेत. काय आहेत ती समीकरणं?

Baba Vanga Prediction 2025 : जुलै 2025 एक असा महिना, त्याकडे इतिहास, खगोलशास्त्र आणि भविष्यवाणी हे तिन्ही एक मोठा इशारा करत आहेत. भविष्यवेत्ती बाबा वेंगाने अनेक वर्षांपूर्वी व्यक्त केलेली ती भीती खरी ठरणार का? कारण आकाशातील ग्रहतारे सर्वच त्याकडे लक्ष वेधत आहेत. शनि वक्री होत आहे. तर गुरूचा अस्त होत आहे. त्यामुळे युद्धाचे ढग गडद होतात, असे मानल्या जाते. खरंच तिसरे महायुद्ध होणार? मानवाचा विनाश जवळ आला आहे का?
जुलै 2025 हा केवळ एक महिना नाही तर एक इशारा पण आहे. या काळात ग्रहांची चाल, बाबा वेंगाचे भाकीत आणि जागतिक घडामोडी एकाच दिशेने संकेत देत आहेत. त्यामुळे हा योगायोग नक्कीच नाही. काय मानव त्याच चुका, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करेल का? Baba Vanga ने याविषयीचे मोठे भाकीत केले आहे. तिच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहेत आता ग्रहांची स्थिती?
ग्रहांची चाल, धोक्याचे संकेत
गुरू अस्त (९ जून – ७ जुलै २०२५)
मिथुन राशीत गुरूच्या अस्त अवस्थेमुळे नीती, धर्म, विवेक आणि नेतृत्व क्षीण होते. गुरू जेव्हा अस्त होतो तेव्हा समाज दिशाहीन होतो, असे ज्योतिषशास्त्राचे संकेत आहेत.
शनि वक्री (१३ जुलै – ३० नोव्हेंबर २०२५)
शनि मीन राशीत वक्री होणार आहे, त्यामुळे न्याय आणि शिस्त लयाला जाते. त्यामुळे सत्ताकेंद्र आणि न्यायव्यवस्थेतील गोंधळाची स्थिती येईल, असे ग्रहांचे संकेत आहे.
गुरू अतिचार गती
गुरू मिथुन राशीत ‘अतिचारी गती’ने भ्रम निर्माण करतो. त्यामुळे निर्णय घेताना गोंधळ उडतो. नीतीमूल्य हरवते. मंगळाची दृष्टी मिथुन राशीवर असल्याने युद्धाचे संकेत अधिक तीव्र होतात, असे ग्रहमानाचे संकेत आहेत. या सर्व ग्रहमानांमुळे युद्धाचे सावट असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो.
डिस्क्लेमर : उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती देण्यात आली आहे. बाबा वेंगाची भाकीत ही अचूक घटनेसह वा तारखेसह नाहीत. टीव्ही 9 मराठी याला दुजोरा देत नाही.
