सर्वात कमी खर्च आणि आरामदायी प्रवास, भारतातील ही 3 ठिकाणे आहेत स्वर्गापेक्षाही सुंदर

जर तुम्हाला देखील कमी खर्चात आणि आरामदायी प्रवास करायचा असेल तर भारतातील ही तीन सुंदर ठिकाणं आहेत एकदम खास. लाखो पर्यटन देतात रोज भेट.

| Updated on: Jan 21, 2026 | 4:33 PM
1 / 5
प्रत्येकाला वेगवेगळ्या आणि सुंदर ठिकाणी फिरण्याची आवड असते. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष प्रवासाची वेळ येते, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कुठे जायचं आणि कसं जायचं?

2 / 5
त्यासोबतच अनेकांना महागडा प्रवास नको असतो. त्यासोबतच आरामदायी प्रवास हवा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा तीन ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे जाण्यासाठी कमी खर्च आणि आरामदायी प्रवास करून तुम्ही जाऊ शकता.

3 / 5
राजस्थानमधील जयपूर हे शहर ‘ऐतिहासिक वास्तू, राजेशाही किल्ले आणि रंगीबेरंगी बाजारपेठांमुळे पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरते. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांशी जयपूरचे रेल्वे कनेक्शन अत्यंत मजबूत आहे. बजेटमध्ये फिरता येणारे, कुटुंब आणि मित्रांसाठी योग्य असलेले जयपूर हे ट्रेनने फिरण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण मानले जाते.

4 / 5
वाराणसी हे भारतातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक शहर मानले जाते. अध्यात्म, परंपरा आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो. भारताच्या जवळपास प्रत्येक भागातून वाराणसीला थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास ठरवला तरी ट्रेनमुळे अडचण येत नाही.

5 / 5
उत्तर भारतातील अमृतसर हे आणखी एक अत्यंत ट्रेन-फ्रेंडली शहर आहे. दिल्ली, चंदीगड आणि जयपूर येथून अमृतसरला नियमित आणि स्वस्त रेल्वे सेवा उपलब्ध आहे. बजेटमध्ये फिरता येणारे हे शहर प्रवाशांसाठी अतिशय सोयीचे आहे.