
एक तरुणीचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांनी एकमेकांना पसंत केल्याने घरच्यांनी आडकाठी आणली नाही. संसार सुरळीत सुरू असतानाच या तरुणीच्या आयुष्यात अजून एकाने एंट्री केली. त्याला भेटण्यासाठी ती चोरून लपून जात होती. पतीला याविषयी कधी शंका आली नाही. पण सासऱ्याला तिचे बदललेले वागणे खटकले. त्याने तिच्यावर पाळत ठेवली आणि सूनेला प्रियकरासोबत रंगेहात पकडल्यानंतर त्याच्याशी लग्न लावून दिले. विशेष म्हणजे या लग्नाची तयारी, खर्च पतीने केला आणि पत्नीला वाटी लावले, तिची विदाई केली. हे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
बुलेट कुमारवर जडला जीव
माहितीनुसार, बिहारमधील मुझफ्फपूरमधील बेरूआ (गायघाट) येथील खुशीचे दरभंगा जिल्ह्यातील बनोली या गावातील राजू कुमार सोबत प्रेमसंबंध होते. 2021 मध्ये घरच्यांना ही बाब माहिती झाल्यावर दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबांनी संमती दिली. त्यांना 2022 मध्ये एक मुलगा झाला. दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. पण 2024 मध्ये खुशी पतीसोबत बिहार येथून दिल्लीला गेली. येथे दिल्लीची ओळख बुलेट कुमार सोबत झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघे प्रेमात पडले.
काही दिवसांनी ते पुन्हा गावी परतले. पतीला पत्नी धोका देत असल्याचे कधी समजलेच नाही. पण खुशीचे मन गावात लागेना. ती त्याला शेतात जाऊन फोन करत असे. आजकाल सूनेचे कशातच लक्ष लागत नसल्याचे सासऱ्याच्या लक्षात आले. त्याने तिच्यावर पाळत ठेवली. एकदिवशी घरी कोणीच राहणार लक्षात येताच खुशीने प्रियकर बुलेट कुमारला गावात बोलावले. तो घरी आला.
तेव्हा सासऱ्याने दोघांना रंगेहात पकडले. बुलेट कुमार पळून जात असताना त्याला गावकऱ्यांनी पकडले. पोलिसांना बोलवण्यात आले. खुशीने आपणच त्याला बोलावल्याचे सांगितले. बुलेट कुमारसोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे सगळेच हतबल झाले.
सासऱ्याने लावून दिले लग्न
मग सासऱ्याने सुनेचे तिच्या प्रियकराशी लग्न लावण्याचा निर्णय घेतला. पतीने पण तिच्या आनंदा आड न येण्याचे आणि मुल सांभाळणार असल्याचे जाहीर केले. एका गुरूजीला बोलावून, हार आणून दोघांचे लग्न लावण्यात आले. पतीने, खुशीला वाटी लावले. या लग्नाची एकच चर्चा होत आहे. तर सर्व जण राजू कुमार याच्या समजूतदारपणाचे कौतुक करत आहेत.