प्रसिद्धी डोक्यात गेली, ज्यांच्या जीवावर मोठा झाला त्यांनाच…; प्रसिद्ध यूट्यूबर प्रचंड ट्रोल

Youtuber Raja Vlogs Troll On His New Home Searching Video : हा तर 40 लाख लोकांना मूर्ख बनवतोय... प्रसिद्ध व्लॉगर राजा प्रचंड ट्रोल... बिहारमधील प्रसिद्ध यूट्यूबरवर नेटकरी नाराज... प्रसिद्ध यूट्यूबर प्रचंड ट्रोल, नेटकरी म्हणाले, आई-वडिलांना असं बोलताना लाज वाटत नाही का? वाचा सविस्तर...

प्रसिद्धी डोक्यात गेली, ज्यांच्या जीवावर मोठा झाला त्यांनाच...; प्रसिद्ध यूट्यूबर प्रचंड ट्रोल
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 1:40 PM

सोशल मीडिया… हे एक असं आभासी विश्व आहे. जिथे नेटकरी कधी तुम्हाला डोक्यावर घेतील. तर कधी तुम्हाला ट्रोल करतील… बिहारच्या तरूणाबाबतही असंच होत आहे. बिहारमधील समस्तीपूरचा असणारा यूट्यूबर राजा याला आधी नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं. मात्र आता त्याच्या एका कृतीमुळे नेटकऱ्यांना प्रचंड ट्रोल करायला सुरूवात केली आहे. राजा व्लॉगने नुकतंच काही व्हीडिओ शेअर केलेत. यात त्याने त्याच्या घरातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलंय. आई-वडील, बहीण त्याला कसं त्रास देतात. यावर तो बोलला आहे. मात्र या व्हीडिओवरून नेटकऱ्यांनी मात्र त्याला प्रचंड ट्रोल केलं आहे.

व्हीडिओत नेमकं काय?

राजा व्लॉग याने काही व्हीडिओ शेअर केलेत. यात त्याने त्याच्या घरच्यांकडून त्याची फसवणूक होत असल्याचं म्हटलं आहे. माझ्या लहान बहीण एका मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट करत होती. माझा त्याला नकार होता. मात्र माझ्या आईने तिला पळून जायला मदत केली. बहिणीने व्यसनी मुलाशी लग्न केलं. ते मला पटलं नाही. तू तुझ्या सासरहून 10 लाख आण. त्यातले चार लाख रूपये बहिणीला दे म्हणून आई माझ्या मागे लागली आहे. हे मला पटत नाहीये, असं राजाने या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.

प्रसिद्ध व्लॉगर राजा प्रचंड ट्रोल

राजाने हे व्हीडिओ शेअर करताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी राजाची बाजू घेतली आहे. तर काहींनी राजाला प्रचंड ट्रोल केलं आहे. ज्या आई-वडिलांच्या जीवावर मोठा झालास. त्यांच्याबद्दलच तू असं बोलतोस? लाज वाटली पाहिजे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. हा तर 40 लाख लोकांना मूर्ख बनवतोय, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे. याचे चार मिलियन फॉलोअर्स आहेत. त्या 40 लाख लोकांना मूर्ख बनवतोय, अशी कमेंट आणखी एका नेटकऱ्याने केली आहे.

राजा व्लॉग नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. शिवाय राजाचं यूट्यूब चॅनेल देखील आहे. यावर तो व्हीडिओ शेअर करत असतो. या व्हीडिओमध्ये राजा त्याच्या आई-वडिलांसोबत व्हीडिओ करतो. आता तो त्याच्या पत्नीसोबत व्हीडिओ शूट करतो. काही कॉमेडी व्हीडिओदेखील राजा शेअर करतो. त्याचे हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. लग्नात पत्नीला सिंदूर लावतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला होता. पण आता मात्र नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.