Video | भरधाव वेगात रेल्वे रुळ पार करण्याचा प्रयत्न, फाटकाला आदळून मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Sep 23, 2021 | 4:43 PM

बहुतांश अपघात हे मानवी चुकांमुळेच होतात. सध्या अशाच एका माणसाच्या अतिघाईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याव्हिडीओमध्ये माणूस रेल्वे फाटकाला आदळून खाली पडला आहे.

Video | भरधाव वेगात रेल्वे रुळ पार करण्याचा प्रयत्न, फाटकाला आदळून मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

मुंबई : आपल्या देशात अपघातामुळे दरवर्षी हजारो नागरिकांचा मृत्यू होतो. काही अपघात तर एवढे भीषण असतात की त्यांना विसरणे अशक्य होऊन बसते. बहुतांश अपघात हे मानवी चुकांमुळेच होतात. सध्या अशाच एका माणसाच्या अतिघाईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याव्हिडीओमध्ये माणूस रेल्वेफाटकाला आदळून खाली पडला आहे. (bike rider trying to cross railway gate accident video went viral on social media)

रेल्वे येत असूनदेखील प्रवाशांची ये-जा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र व्हिडीओमध्ये रेल्वे फाटकावर झालेला भीषण अपघात दाखवण्यात आला आहे. रेल्वे येत असल्यामुळे रेल्वेचे कर्मचारी फाटक बंद करत आहेत. फाटक बंद होत असल्यामुळे प्रवासी कार, ट्रक तसेच दुचाकी घेऊन वेगात येजा करत आहेत. समोरुन रेल्व येत असेल याची कसलीही भीती न बाळगता प्रवासी रुळ पार करत आहेत. तर वाहनांची येजा पाहून रेल्वे फाटकावरील कर्मचारीदेखील फाटक लावण्याचे टाळत आहेत.

दुचाकी वेगात चावलत फाटक पार करण्याचा प्रयत्न

शेवटी रेल्वे जवळ आल्यामुळे तसेच वाहनांची गर्दी कमी झाल्यामुळे कर्मचारी रेल्वेचे फाटक बंद करत असल्याचे दिसतेय. मात्र लवकर जाण्याच्या विचारत एक दुचाकीस्वार मोठ्या घाईत आला आहे. वेगात दुचाकी चालवत माणसाने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र याच वेळी मोठा घोळ झाला आहे. रेल्वेचे फाटक लागलेले असल्यामुळे तो थेट फाटकावर जाऊन आदळलाय. या भीषण अपघातात दुचाकीसुद्धा खाली पडली आहे. हा अपघात कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी अती घाई संकटात नेई असे म्हणत वाहने सावकाश चावलण्याचा सल्ला दिला आहे. तर रेल्वे रुळावरुन अशा प्रकारे घाईत दुचाकी चालवणे चुकीचे असल्याचे म्हणत माणसावर टीका केलीय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला @DoctorAjayita या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

सुई पाहून लस घेण्यास नकार, पण मित्रांनी शक्कल लढवली, नेमकं काय केलं ? व्हिडीओ पाहाच

Viral Video: टब शिंगावर घेऊन म्हशीची कलाकारी, लोक म्हणाले, ‘हिच्यापुढे फूटबॉल प्लेअरही फेल’

Viral Video : डिमांडिंग आजीबाई स्मार्ट Alexa वरही भारी, केली एवढी डिमांड की Alexaचंही डोकं चक्रावलं!

(bike rider trying to cross railway gate accident video went viral on social media)