Viral Video: टब शिंगावर घेऊन म्हशीची कलाकारी, लोक म्हणाले, ‘हिच्यापुढे फूटबॉल प्लेअरही फेल’

एका म्हशीला खुंटीला बांधू ठेवलं आहे, तिथं ती रवंथ करत बसली आहे. मात्र, तिच्या डोक्यावर एक प्लास्टिकचा टब आहे

Viral Video: टब शिंगावर घेऊन म्हशीची कलाकारी, लोक म्हणाले, 'हिच्यापुढे फूटबॉल प्लेअरही फेल'
शिंगांमध्ये गुंतलेला डब म्हैश जोर जोरात फिरवत आहे.

आतापर्यंत तुम्ही अनेक कलाकार पाहिले असतील, जे त्यांच्या कलेने सर्वांना आवाक करतात, मात्र, माणसं नाही तर प्राणीही कधी कधी अशा कला दाखवतात, की पाहणारे आश्चर्यचकित होऊन जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये एक म्हैस (Buffalo Video) आपली अनोखी कला दाखवत आहे, जी कला पाहून तुम्हीला आश्चर्याचा धक्काच बसेल. (A buffalo carrying a plastic tub on its horns. The video went viral)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका म्हशीला खुंटीला बांधू ठेवलं आहे, तिथं ती रवंथ करत बसली आहे. मात्र, तिच्या डोक्यावर एक प्लास्टिकचा टब आहे, कदाचित या टबातच मालकाने तिला वैरण टाकलं असेल, पण टब मोकळा झाल्यानंतर म्हैशीने तो डोक्यावर घेतला. आणि आपल्या शिंगांमध्ये गुंतवला. आता हा शिंगांमध्ये गुंतलेला डब म्हैश जोर जोरात फिरवत आहे. ज्या प्रकारे फुटबॉलपटू बोटांवर फूटबॉल फिरवतात, तशाच प्रकारे ही म्हैस हा गोल टब फिरवत आहे.

22 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे, ज्यात म्हशीला बांधण्यात आल्याचंही दिसतं आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, हा टब जाणून बुजून तिच्या शिंगात फसवण्यात आला आहे, आणि आता म्हैस तो टब काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही नेटकऱ्यांना ही म्हशीची कला वाटते. त्यांच्यामते मोकळा झालेला टब म्हशीनेच डोक्यावर घेतला असणार. अगदी सर्कसमध्ये ज्याप्रकारे कलाकारी दाखवली जाते, तशाच प्रकारे कलाकारी ही म्हैस इथं दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण म्हणतो आहे की असं टॅलेंट त्यांनी आधी पाहिलं नाही.

पाहा व्हिडीओ:

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Dogratishaa या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं, आमच्या देशातील म्हशीही कलाकार आहेत. या व्हिडीओला बातमी लिहली जाईपर्यंत 17 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं होतं, तर 2 हजाराहून अधिक लाईक याला मिळाले होते. प्राण्याच्या अशा कलाकारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात,आणि लोकांनाही अशाच प्रकारचे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात.

हेही वाचा:

Viral Video : डिमांडिंग आजीबाई स्मार्ट Alexa वरही भारी, केली एवढी डिमांड की Alexaचंही डोकं चक्रावलं!

Video | एकमेकींना कडकडून मिठी मारताना दिसल्या दोन क्युट मांजरी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI