AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेच्या गॅदरिंगमध्ये Besharam Rang वर मुलाचा जलवा! लोक म्हणाले, “हमारा छोरा, छोरियों से कम है क्या…”

आजवर तुम्ही डान्सचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मुलींच्या अदा आणि मुलांचा जलवा डान्सच्या व्हिडीओमध्ये बघण्यासारखा असतो. पण आता सोशल मीडियामुळे आपल्याला इतके व्हिडीओ बघायला मिळतायत की त्यात मुलांच्या अदा आणि मुलींचा जलवा बघायला मिळतोय. या मुलाने दीपिकाच्या गाण्यावर दीपिकालाच टक्कर एक डान्स केलाय. हा डान्स इतका व्हायरल झालाय की तुम्ही सुद्धा पुन्हा-पुन्हा बघाल.

शाळेच्या गॅदरिंगमध्ये Besharam Rang वर मुलाचा जलवा! लोक म्हणाले, हमारा छोरा, छोरियों से कम है क्या…
dance on besharam rang songImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 13, 2023 | 12:41 PM
Share

मुंबई: शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचं टॅलेंट दाखवायला जागा मिळते. आता तर टॅलेंट दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म्स पाच पट झालेत. आता कार्यक्रम तर आहेतच पण त्यासोबतच सोशल मीडिया सुद्धा आहे. सोशल मीडियावर रोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे, कधी गाण्याचे व्हिडीओ. या प्लॅटफॉर्म्समुळे लोक सुद्धा छान खुलायला लागलेत. म्हणजे जगभरातून इतक्या पद्धतींचे व्हिडीओ समोर येतात की लोक सुद्धा आता मनात असेल ते करून मोकळे होतात, लाजत नाहीत. मुलं सुद्धा मुलींसारखा डान्स करतात, कधी-कधी तर ते स्कर्ट, साडी नेसून वगैरे डान्स करतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक मुलगा त्याच्या शाळेच्या कार्यक्रमात जबरदस्त डान्स करतोय.

मुलीलाही असा डान्स जमणार नाही

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा जबरदस्त डान्स करतोय. हा मुलगा दीपिका पदुकोण सारखा डान्स करतोय. या गाण्यावर दीपिकाची जी हुक स्टेप आहे तीच हा मुलगा करतोय आणि त्याला इतर मुलं जबरदस्त प्रतिसाद देतायत. तो जेव्हा डान्स करतोय तेव्हा या व्हिडीओ मध्ये मागून प्रेक्षकांचा आवाज सुद्धा येतोय. एखाद्या मुलीलाही असा डान्स जमणार नाही या प्रकारे हा मुलगा ठुमके लागावतोय.

Besharam Rang वर मुलाने ठुमके लगावले

@gauravsitoula_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केलाय. अनेक जणांनी यावर प्रतिक्रिया दिलीये. “हमारा छोरा, छोरियों से कम है क्या…” हा दंगल चित्रपटाला डायलॉग लोकांनी फिरवून वापरलाय. हा मुलगा पठाण चित्रपटातील Besharam Rang गाण्यावर नाचतोय. पठाण चित्रपटाची क्रेझ आजही लोकांमध्ये आहे. या गाण्यावर कित्येक रिल्स, व्हिडीओ आजही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतायत. शाहरुख आणि दीपिकाच्या याच गाण्यावर या मुलाने ठुमके लगावलेत. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा-पुन्हा बघाल.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच