Video | चर्चेत येण्यासाठी स्पोर्ट बाईकवरुन स्टंटबाजी, मुंबई पोलिसांनी दाखवला इंगा, व्हिडिओ व्हायरल

सध्या अशाच वेडापाई मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खुद्द मुंबई पोलिसांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

Video | चर्चेत येण्यासाठी स्पोर्ट बाईकवरुन स्टंटबाजी, मुंबई पोलिसांनी दाखवला इंगा, व्हिडिओ व्हायरल
BIKE DRIVING VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसेच लोकांचे लक्ष स्वत:कडे वेधण्यासाठी तरुण वेगवेगळ्या शक्कल लढवतात. कधीकधी काही लोक यामध्ये यशस्वीदेखील होतात. मात्र, अनेकवेळा काहीतरी वेगळं करुन दाखवण्याच्या वेडापाई हीच तरुण मंडळी मोठ्या चुका करतात. सध्या अशाच वेडापाई मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खुद्द मुंबई पोलिसांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. (boy performing stunt breaks traffic rules video went viral on social media)

स्टंटबाजी करताना वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले

या व्हिडीओमध्ये दोन तरुण एका स्पोर्ट बाईकवर शॉर्ट व्हिडीओ तयार करताना दिसत आहेत. भररस्त्यात शॉर्ट व्हिडीओ करताना आपला अपघात होण्याची शक्यता आहे, याचेही भान त्यांना राहिलेले नाही. विशेष म्हणजे यावेळी स्टंटबाजी करताना या तरुणांनी वाहतुकीचे नियमसुद्धा पायदळी तुडवले आहेत.

दुचाकी चालवत असलेल्या तरुणाला चाकू खुपसण्याचे नाटक

व्हिडीओमध्ये एका आवाजावर दोन तरुण चालत्या गाडीवर हावभाव करत आहेत. मागे बसलेल्या तरुणाने दुचाकी चालवत असलेल्या तरुणाला चाकू खुपसण्याचे नाटक केले आहे. यानंतर समोर बसलेला तरुण खाली कोसळण्याचे नाटक करतोय. या गडबडीमध्ये तरुणाचा अपघातसुद्धा झाला आहे.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियार व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या तरुणांना शोधून आणत त्यांच्यावर वाहन वेगात चावलणे तसेच नियमांचे उल्लंघन करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. सोबतच मुंबई पोलिसांनी आयुष्य हे प्लास्टिक नाही. काळजी घ्या, असे आवाहन केले आहे.

इतर बातम्या :

Video | ही मुलगी आहे की स्प्रिंग ! लवचिक शरीर अन् चकित करणाऱ्या कसरती एकदा पाहाच

Video | नक्कल करण्याच्या नादात मोठा घोळ, भाऊ थेट जमिनीवर आदळला, स्टंटचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | नवरदेव प्रेमाने घास भरवायला गेला, नवरीने मात्र भलतंच केलं, व्हिडीओ व्हायरल

(boy performing stunt breaks traffic rules video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI