Video | ही मुलगी आहे की स्प्रिंग ! लवचिक शरीर अन् चकित करणाऱ्या कसरती एकदा पाहाच

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर आपल्याला थक्क करणारा आहे. या व्हिडीओमध्य एक चार वर्षाची चिमुकली वेगवेगळे स्टंट थरारक पद्धतीने करत आहे. या मुलीच्या स्टंट्सना पाहून सगळे अवाक् झाले आहेत.

Video | ही मुलगी आहे की स्प्रिंग ! लवचिक शरीर अन् चकित करणाऱ्या कसरती एकदा पाहाच
GIRL STUNT VIRAL VIDEO

मुंबईी : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला चकित करुन सोडतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर आपल्याला थक्क करणारा आहे. या व्हिडीओमध्य एक चार वर्षाची चिमुकली वेगवेगळे स्टंट थरारक पद्धतीने करत आहे. या मुलीच्या स्टंट्सना पाहून सगळे अवाक् झाले आहेत. (four year old little girl doing amazing karate stunt video went viral on social media)

ट्रेनिंग सेंटरमध्ये चार वर्षाच्या मुलीचे स्टंट 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक चार वर्षांची मुलगी अगदीच थरारक पद्धतीने स्टंट करत आहे. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे मुलगी जिथं कसरती करताना दिसत आहे; ते एक कराटे ट्रेनिंग सेंटर असावे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये चार वर्षाची मुलगी तिच्यातील कसब दाखवत आहे. तिने सुरुवातीला सर्वांना नमस्कार केला आहे. नंतर चार वर्षांची ही मुलगी स्ट्रेचिंग तसेच कोलांटउड्यासुद्धा घेत आहे. हे सर्व थरारक स्टंट्स करत असताना व्हिडीओतील मुलगी  किंचितही चुकत नाहीये. सरावाच्या जोरावर तिने या सर्व स्टंट्सवर सिद्धी मिळवली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. एवढी छोटी मुलगी अशक्यप्राय वाटणाऱ्या अशा थरारक कसरती कशा करु शकते ? असा प्रश्न लोकांना पडला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही लोकांनी या चार वर्षीय मुलीचे तोडं भरुन कौतूक केले आहे. काही लोकांनी या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर केलेय. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा केली जात आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | नक्कल करण्याच्या नादात मोठा घोळ, भाऊ थेट जमिनीवर आदळला, स्टंटचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | नवरदेव प्रेमाने घास भरवायला गेला, नवरीने मात्र भलतंच केलं, व्हिडीओ व्हायरल

Video | भररस्त्यात दोन महिलांची मारामारी, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया


(four year old little girl doing amazing karate stunt video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI