Video | भररस्त्यात दोन महिलांची मारामारी, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

या व्हिडीओमध्ये दोन महिला भांडण करत आहेत. यातील एक महिला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरी महिला तिला झाडूने मारताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Video | भररस्त्यात दोन महिलांची मारामारी, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया
womens fight video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. तरुणींच्या मारामारीचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय ठरतात. पण यावेळी एक वेगळाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला भांडण करत आहेत. यातील एक महिला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरी महिला तिला झाडूने मारताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. (two women fighting video went viral on social media)

दोन महिलांची भर रस्त्यात मारामारी

यापूर्वी आपण तरुणींच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. रस्त्यावर, हॉटेलमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये तरुणी सर्रास भांडणं करताना दिसतात. काही वेळा तर या तरुणींमध्ये थेट हाणामारी सुद्धा होते. असे असले तरी सध्या मात्र दोन महिलांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये या महिला भांडण करताना दिसत आहेत. यातील एक महिला अतिशय रागात असून ती समोरच्या महिलेला झाडूने मारत आहे. तर समोरची महिला रडत असून ती चांगलीच घाबरल्याचे दिसत आहे. ती पहिल्या मला वाचवा अशी विनवणी करताना आपल्याला दिसतेय. मात्र कुणीही या महिलेला वाचवण्यासाठी जात नाहीये. थोड्या वेळानंतर अचानकपणे तिसरी एक महिला आल्याचे आपल्याला दिसते. या महिलेने झाडूने मार खाणाऱ्या महिलेला वाचवले आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Young Landlord (@younglandlord01)

नेटऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया, म्हणतात हे तर चित्रपटाचं शूटिंग

हा संपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून नेटकरी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी हे भांडण अतिशय विनोदी असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हे भांडण एखाद्या चित्रपटाची शूटिंग असल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया दिलीय. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही; मात्र त्याला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | किचन साफ करताना नवऱ्याचा भलताच कारनामा, मुलाला खावा लागला मार, व्हिडीओ व्हायरल

Video | रांगेत उभं राहून लोक परेशान, भाऊचा मात्र न्याराच स्वॅग, लसीसाठीचं जुगाड पाहाच !

Video | सगळं विसरत दोस्तांची मस्ती, पण झोक्यानं दिला धोका, पाहा नेमकं काय घडलं ?

(two women fighting video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI