Video | किचन साफ करताना नवऱ्याचा भलताच कारनामा, मुलाला खावा लागला मार, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांच्या कारनाम्यामुळे चांगलाच मार खाल्ला आहे. मुलाच्या आईने त्याला चांगलाच मार दिलाय.

Video | किचन साफ करताना नवऱ्याचा भलताच कारनामा, मुलाला खावा लागला मार, व्हिडीओ व्हायरल
VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ थरारक असतात तर काही खळखळून हसायला लावतात. सध्या मात्र, एक अतिशय मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांच्या कारनाम्यामुळे चांगलाच मार खाल्ला आहे. मुलाच्या आईने त्याला चांगलाच मार दिलाय. (woman beating her son due to husbands mistake video went viral on social media)

किचन साफ करताना नवऱ्याचा भलताच कारनामा 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला किचन साफ करताना दिसतेय. किचन साफ करताना या महिलेच्या मागे तिचा मुलगा उभा आहे. हा मुलगा मोबईलमध्ये व्यस्त आहे. याचवेळी व्हिडीओमध्ये मागे उभे राहिलेल्या मुलाचे वडील किचनध्ये आले आहेत. त्यांनी मुलाची आई किचन साफ करत असताना वेगळाच कारनामा केला आहे. किचन साफ करताना त्यांनी फरशीवर केचअप टाकले आहे. किचनवर केचअप टाकल्याची कल्पना व्हिडीओतील महिला तसेच बाजूला फोन घेऊन उभे राहिलेल्या मुलाला नाही. केचअप खाली सांडवून व्हिडीओमध्ये दिसणारा माणूस पळून गेला आहे.

आईने मुलाला चांगलाच मार दिला

त्यानंतर मोठ्या मेहनतीने किचन साफ करुनही फरशीवर केचअप टाकल्यामुळे महिला चांगलीच खवळली आहे. या महिलेने मागे उभे असलेल्या आपल्या मुलाला मारणे सुरु केले आहे. फोनमध्ये दंग असलेल्या या मुलाला आपल्या वडिलांच्या कारनाम्यानुळे मार खावा लागला आहे. व्हिडीओतील महिलेने मुलाला मारत मारत किचनच्या बाहेर काढले आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा 

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर hepgul5 या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला लाईकसुद्धा केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | रांगेत उभं राहून लोक परेशान, भाऊचा मात्र न्याराच स्वॅग, लसीसाठीचं जुगाड पाहाच !

Mile Sur Mera Tumhara : स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, पाहा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गाणं नव्या रुपात

Video | नवरीच्या अदाकारीवर नेटकरी फिदा तर ठुमके पाहून नवरदेव घायाळ, व्हिडीओ एकदा पाहाच !

(woman beating her son due to husbands mistake video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI