Video | नवरीच्या अदाकारीवर नेटकरी फिदा तर ठुमके पाहून नवरदेव घायाळ, व्हिडीओ एकदा पाहाच !

सध्या एका नव्या नवरीचा अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरीने आपल्या नवरदेवासाठी अतिशय गोड डान्स केला आहे. नवरीचे सौंदर्य तसेच तिने केलेला डान्स यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनमोहक मेकअप करुन नवरी नवरदेवासमोर आली

Video | नवरीच्या अदाकारीवर नेटकरी फिदा तर ठुमके पाहून नवरदेव घायाळ, व्हिडीओ एकदा पाहाच !
bride dance viral video

मुंबई : आपले लग्न लोकांच्या तसेच स्वत:च्या स्मरणात राहावे म्हणून नवरी-नवरेदव वेगवेगळी शक्कल लढवतात. एखादी नवरी संपूर्ण मेकअप करुन बुलेटवर लग्नमंडपात आल्याचे आपण पाहिले असेल. तर काही मुली लग्नमंडपात आपल्या नवरदेवाला अनोख्या स्टाईलने प्रपोज करतात. सध्या एका नव्या नवरीचा अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरीने आपल्या नवरदेवासाठी अतिशय गोड डान्स केला आहे. नवरीचे सौंदर्य तसेच तिने केलेला डान्स यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (beautiful bride dancing on aankh uthi mohabbat me song in front of groom video went viral on social media)

मनमोहक मेकअप करुन नवरी नवरदेवासमोर आली

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक सुंदर नवरी नटून थटून आलेली आपल्याला दिसत आहे. अतिशय मनमोहक मेकअप करुन ही नवरी आपल्या नवरदेवासमोर लग्नमंडपात आली आहे. लग्नमंडपात येताच नवरदेवासमोर ती गोड डान्स करत आहे. डान्स करत असताना नवरीच्या अदा आणि ठुमके पाहण्यासारखे आहेत. आपल्या होणाऱ्या बायकोला डान्स करताना पाहून नवरदेव हरखून गेला आहे. आपल्या नवरीला पाहून नवरदेवाला चांगलाच आनंद झाला आहे.

‘आँख उठ्ठी मोहोब्बत में’ नवरीचा धमाकेदार डान्स

या व्हिडीओमध्ये नवरी ‘आँख उठ्ठी मोहोब्बत में’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करत आहे. डान्स करताना ती तिच्या नवरदेवाकडे पाहून हातवारे करत आहे. नवरीला पाहताच नवरदेव तिच्याकडे जाताना आपल्याला दिसत आहे. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा

हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. नवरीच्या अदाकारीमुळे लोक या जोडीवर फिदा झाले आहेत.

इतर बातम्या :

Video | “आमच्या घरातलं मीठ संपलंय वं…लै म्हंजी लै कट्टाळा आलाय” मराठमोळ्या चिमुकलीचं गोड बोलणं एकदा पाहाच

Video | लेकरानं, सुनेनं घराच्या बाहेर काढलं, पोलीस कमिश्नरनं जे केलं त्याची देशभरात तारीफ, बघा काय झालं?

Video | अंगातील जीमवेस्ट काढून तरुणींसोबत प्रँक, नंतर पोलिसाशी पडली गाठ, तरुणाचं पुढे काय झालं ?

(beautiful bride dancing on aankh uthi mohabbat me song in front of groom video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI