Video | रांगेत उभं राहून लोक परेशान, भाऊचा मात्र न्याराच स्वॅग, लसीसाठीचं जुगाड पाहाच !

. लसीची मात्रा मिळावी म्हणून लोक जमेल ते प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या एक मजेदार व्हिडीओ चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये लस घेण्यासाठी एका माणसाने जबरदस्त जुगाड लावले आहे.

Video | रांगेत उभं राहून लोक परेशान, भाऊचा मात्र न्याराच स्वॅग, लसीसाठीचं जुगाड पाहाच !
vaccination

मुंबई : कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. केंद्र सरकारकडून संपूर्ण देशात लसींचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातोय. असे असले तरी काही ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. याच कारणामुळे अनेक ठिकाणी लसीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लसीची मात्रा मिळावी म्हणून लोक जमेल ते प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या एक मजेदार व्हिडीओ चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये लस घेण्यासाठी एका माणसाने जबरदस्त जुगाड लावले आहे. (man did perfect arrangement for corona vaccination funny video went viral on social media)

व्हिडीओध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका माणसाने लसीचा डोस मिळावा म्हणून थेट लसीकरण केंद्रावर सेटिंग लावली आहे. बाहेर लसीकरण केंद्रावर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. लस लवकर मिळावी म्हणून या लोकांची आरडाओरड सुरु आहे. मात्र, लसीकरण केंद्राच्या खिडकीजवळ जाऊन व्हिडीओतील माणसाने लस घेण्यासाठी जबरदस्त डोकं लावलं आहे. तो लस घेण्यासाठी स्पायडरमॅन झालाय. दोन भिंतींवर पाय देऊन तो खिडकीपर्यंत पोहोचला आहे. तसेच बाहेर आरडाओरडा सुरु असूनदेखील लसीकरण केंद्रातील नर्सने त्याला लस दिली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

व्हायरल होणारा हा व्हिडीओ बिहारमधील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्यायत. तसेच काही लोकांनी या व्हिडीओला घेऊन राजकीय प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. बिहारचे नेते लालूप्रसाद यादव यांचे पुत्र प्रताप यादव यांनी “आता बिहारमध्ये लस घेणे आणखी सोपे झाले आहे. अशा प्रकारची व्यवस्था करुन दिल्याबद्दल सरकारचे विशेष आभार,” असे खोचक ट्विटर केले आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

इतर बातम्या :

Happy Independence Day : ‘या’ देशभक्तीपर गाण्यांसोबत साजरा करा स्वातंत्र्य दिवस

Video | सगळं विसरत दोस्तांची मस्ती, पण झोक्यानं दिला धोका, पाहा नेमकं काय घडलं ?

Video | नवरीच्या अदाकारीवर नेटकरी फिदा तर ठुमके पाहून नवरदेव घायाळ, व्हिडीओ एकदा पाहाच !

(man did perfect arrangement for corona vaccination funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI