AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | लग्न असावं तर असं ! भाऊच्या लग्नात पैसे उधळण्यासाठी चढाओढ, व्हिडीओ एकदा पाहाच

लग्नसोहळ्यातील व्हिडीओ चर्चेचा विषय़ ठरतात. सध्या एक अगदीच विशेष व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नव्या जोडीच्या डोक्यावर पैसे उधण्याची चक्क शर्यत लागली आहे.

Video | लग्न असावं तर असं ! भाऊच्या लग्नात पैसे उधळण्यासाठी चढाओढ, व्हिडीओ एकदा पाहाच
MARRIAGE VIRAL VIDEO
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 15, 2021 | 7:17 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. लग्न समारंभातील व्हिडीओ तर अनेक वेळा व्हायरल होतात. नवरी-नवरदेवांनी केलेली मस्ती या व्हिडीओंमध्ये पाहण्यासारखी असते. कदाचित याच कारणामुळे लग्नसोहळ्यातील व्हिडीओ चर्चेचा विषय़ ठरतात. सध्या एक अगदीच विशेष व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नव्या जोडीच्या डोक्यावर पैसे उधळण्याची चक्क शर्यत लागली आहे. (competition for notes blowing on bride and groom video went viral on social media)

पैसे उधळण्यासाठी चक्क चढाओढ

आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होत असेल तर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी लोक वेगवेगळ्या युक्त्या वापतात. काही लोक नव्या जोडीच्या डोक्यावर पैशांची उधळण करतात. पैसे उधळणीचे अनेक व्हिडीओ आपण यापूर्वी पाहिलेही असतील. मात्र, या व्हिडीओमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला आहे. पैसे उधळण्यासाठी येथे चक्क चढाओढ लागल्याचे आपल्याला दिसत आहे.

महिलेच्या हातामध्ये शंभर रुपयाच्या नोटा

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक माणूस नवरी-नवरदेवाच्या मागे उभा असल्याचे आपल्याला दिसत आहे. नव्या जोडीच्या मागे उभे राहून हा माणूस त्यांच्यावर पैशांची उधळण करत आहे. दहा रुपयांच्या नोटा तो उधळत आहे. मात्र मध्येच एका महिलेने एन्ट्री मारली आहे. या महिलेच्या हातामध्ये शंभर रुपयाच्या नोटा आहेत. कशाचीही पर्वा न करता ही महिला नव्या जोडीवर पैसे उधळत आहेत. महिला शंभर रुपयांच्या नोटा उधळत असल्याचे पाहून बाजूला उभा असलेला माणूस चकित झाला आहे.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

पैसे उधळण्यासाठी लागलेली ही चढाओढ पाहून व्हिडीओतील नवरी-नवरदेव चांगलेच हसायला लागले आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओला पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. लोक या व्हिडीओला विविध समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | नवरा-बायको खात होते आईसक्रीम, मध्येच मुलं आले, नंतर बायकोने काय केलं एकदा पाहाच !

Video | इवलासा जीव पण मोठी कमाल, पक्ष्याने घरटं कसं विणलं एकदा पाहाच !

Video | ना घोडा ना वाजंत्री, पठ्ठ्या मित्रांच्या खांद्यावर बसून आला, नवरदेवाची खास एन्ट्री एकदा पाहाच !

(competition for notes blowing on bride and groom video went viral on social media)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ