Video | इवलासा जीव पण मोठी कमाल, पक्ष्याने घरटं कसं विणलं एकदा पाहाच !

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या एका पक्ष्याने विलक्षण पद्धतीने स्वत:साठी घरटं बांधलं आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

Video | इवलासा जीव पण मोठी कमाल, पक्ष्याने घरटं कसं विणलं एकदा पाहाच !
BIRD VIRAL VIDEO
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Aug 14, 2021 | 7:39 AM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ चर्चेत येतात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांशी निगडीत असतात. प्राणी-पक्ष्यांनी केलेली करामत नेटकऱ्यांना आवडते. कदाचित याच कारणामुळे सोशल मीडियावर असे व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. सध्या एका पक्ष्याने विलक्षण पद्धतीने स्वत:साठी घरटं बांधलं आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. (small bird weaving nest for his safety video went viral on social media)

पक्षी चोचीने स्वत:साठी घरटं बांधतोय

या व्हिडीओमध्ये एक छोटासा पक्षी आपल्याला दिसतोय. तो त्याच्या चोचीने स्वत:साठी घरटं बांधतोय. आपल्याला राहण्यासाठी एक सुरक्षित निवारा हवा म्हणून हा पक्षी घरटं तयार करताना दिसत आहे. त्यासाठी व्हिडीओतील पक्ष्याने झाडाच्या पानांचा उपयोग केला आहे. झाडाच्या पानांना न तोडता व्हिडीओतील पक्ष्याने स्वत:साठी घरटं विणलंय.

पक्ष्याने झाडाच्या पानांना छित्रं पाडले आहेत

घरटं तयार करतानाचा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. पक्ष्याने झाडाच्या पानांना आपल्या चोचीने छिद्रं पाडले आहेत. या छिद्रांना त्याने एका धाग्याच्या माध्यमातून एकमेकांत विणलं आहे. तीन पानांना एकमेकांत विणून व्हिडीओतील पक्ष्याने सुंदर घरटं तयार केलंय. पक्ष्याची ही मेहनत आणि कला पाहून नेटकरी अचंबित झाले आहे.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या व्हिडीओला शेअर करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला ट्विटरवर Buitengebieden या अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | ना घोडा ना वाजंत्री, पठ्ठ्या मित्रांच्या खांद्यावर बसून आला, नवरदेवाची खास एन्ट्री एकदा पाहाच !

Video | नातवाने प्रॉपर्टी मागितली, आजी म्हणते प्रेम पाहिजे की पैसा, मजेदार भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

Video | “आमच्या घरातलं मीठ संपलंय वं…लै म्हंजी लै कट्टाळा आलाय” मराठमोळ्या चिमुकलीचं गोड बोलणं एकदा पाहाच

(small bird weaving nest for his safety video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें