Video | सगळं विसरत दोस्तांची मस्ती, पण झोक्यानं दिला धोका, पाहा नेमकं काय घडलं ?

सध्या असाच एक दोस्तीत कशी मस्ती केली जाते, हे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काही क्षणात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Video | सगळं विसरत दोस्तांची मस्ती, पण झोक्यानं दिला धोका, पाहा नेमकं काय घडलं ?
swing viral video

मुंबई : सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओंना पाहून आपण खळखळून हसायला लागतो. तर यातील काही व्हिडीओ आपल्या कायम स्मरणात राहतात. सध्या असाच एक दोस्तीत कशी मस्ती केली जाते, हे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काही क्षणात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (group of friends playing in very funny manner video went viral on social media)

दोस्तांची मस्ती अंगलट

या व्हिडीओमध्ये काही तरुण झाडाला बांधण्यात आलेल्या दोरीसोबत मस्त खेळताना दिसत आहे. मुलांची ही मस्ती सुरुवातीला गोड आणि मजेदार वाटत असली तरी नंतर मात्र हीच मस्ती मुलांच्या अंगलट आली आहे. मुलांना त्यांची मस्ती चांगलीच भोवली आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही मुलं झाडाखाली मस्ती करत आहेत. ते झाडाला लावलेल्या एका दोरीचा झोका म्हणून वापर करत आहेत. त्यासाठी काही मुलं झाडावर सिडी लावून चढले आहेत. त्यानंतर झाडावर चढलेले मुलं समोर लटकलेल्या दोरीवर उडी घेत आहेत. त्यानंतर बघता-बघता तब्बल चार मुलं एकमेकांच्या अंगावर उडी घेत दोरीला लटकल्याचे आपल्याला दिसत आहे. मात्र, वजन जास्त झाल्यामुळे हवेत झोके घेणारी दोरी मध्येच तुटली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा मूड फ्रेश

दोर तुटल्यामुळे चारही मुलं खाली जोरात आदळले आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, या व्हिडीओला सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर अपलोड केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | नवरा-बायको खात होते आईसक्रीम, मध्येच मुलं आले, नंतर बायकोने काय केलं एकदा पाहाच !

Video | ना घोडा ना वाजंत्री, पठ्ठ्या मित्रांच्या खांद्यावर बसून आला, नवरदेवाची खास एन्ट्री एकदा पाहाच !

Video | नातवाने प्रॉपर्टी मागितली, आजी म्हणते प्रेम पाहिजे की पैसा, मजेदार भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

(group of friends playing in very funny manner video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI