गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये टाकलं, बॉईज हॉस्टेलमध्ये आणलं, पुढं घडलं असं काही की सगळेच हैराण!

गर्लफ्रेंड ओरडल्यामुळे वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकांना संशय आला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी सुटकेस तपासली तर त्यात एक तरूण मुलगी असल्याचे समोर आले.

गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये टाकलं, बॉईज हॉस्टेलमध्ये आणलं, पुढं घडलं असं काही की सगळेच हैराण!
GIRLFRIEND
| Edited By: | Updated on: Apr 12, 2025 | 3:56 PM

प्रेमात कधी कोण काय करेल याचा नेम नसतो. प्रेमाला कधी जात-धर्म नसतो असं म्हणतात. प्रेमी आपल्या प्रेमासाठी कशाचीही तमा न बाळगता जिवाचं रान करतो. सध्या मात्र एक अजब आणि अवाक करणारा प्रकार समोर आला आहे. एका पठ्ठ्याने आपल्या गर्लफ्रेंडला चक्क सुटकेसमध्ये टाकून थेट मुलांच्या वसतीगृहात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर फारच चर्चेचा विषय ठरला आहे.

हॉस्टेलच्या प्रशासाने तरुणाला पकडलं

एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये टाकून तिला मुलांच्या वसुतीगृहात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तरुणाचा हा प्रयत्न मात्र अपयशी ठरलाय. तरुणीला सुटकेसमधून घेऊन जात असतानाच हॉस्टेलच्या प्रशासनाने त्याला पकडलं आहे. सध्या हा प्रकार सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला आहे.

बॉयफ्रेंडला नेमकं कसं पकडलं?

मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण आपल्या प्रेयसिला सुटकेसमध्ये टाकून मुलांच्या वसतीगृहात घेऊन जात होता. मात्र गर्लफ्रेंडचा आवाज येताच हा प्रकार समोर आला. गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये टाकून घेऊन जात होता. बॉयफ्रेंडने सुटकेस उचलून ती हॉस्टेलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी झटका बसल्याने सुटकेस तुटली यातच सुटकेसमध्ये बसलेल्या गर्लफ्रेंडनेही आवाज केला. त्यामुळे हा सर्व प्रकार उजेडात आला.

गर्लफ्रेंड ओरडल्याने आला संशय, नंतर…

गर्लफ्रेंड ओरडल्यामुळे वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकांना संशय आला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी सुटकेस तपासली तर त्यात एक तरूण मुलगी असल्याचे समोर आले. हा धक्कादायक प्रकाराची सध्यास गळीकडे चर्चा होत आहे.


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ हरियाणा राज्यातील सोनिपत येथील आहे. एका विद्यापीठातील विद्यार्थ्याने हा कारनामा केला आहे. दरम्यान, सुटकेसमधील मुलगी नेमकी कोण आहे, याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तसेच ती कोणत्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे, हेही समजू शकलेले नाही.

दुसरीकडे हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित विद्यापीठाने अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. सोशल मीडियावर मात्र हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. वेगवेगळ्या मंचावर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रॅतिक्रिया व्यक्त कर ताहेत.