Video | नवरीने प्रेमाने रसगुल्ला खायला दिला, पण नवरदेवाने भलतंच काहीतरी केलं, व्हिडीओ व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 01, 2021 | 5:49 PM

सध्या तर एक नवरी-नवरदेवाचा मजेदार व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. नवरदेवाने नवरीला अतिशय विचित्र पद्धतीने रसगुल्ला खायला दिला आहे.

Video | नवरीने प्रेमाने रसगुल्ला खायला दिला, पण नवरदेवाने भलतंच काहीतरी केलं, व्हिडीओ व्हायरल
groom-bride viral video
Follow us

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार तर काही व्हिडीओ आपल्याला थक्क करुन सोडतात. सध्या तर एक नवरी-नवरदेवाचा एक वेगळाच व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. नवरदेवाने नवरीला अतिशय विचित्र पद्धतीने रसगुल्ला खायला दिला आहे. (Bride and Groom eating Rasgulla funny video went viral on social media)

नवदेवाने नवरीला रसगुल्ला खायला दिला

या व्हिडीओमध्ये एका जोडीचे नुकतेचं लग्न झाले आहे. लग्न झाल्यानंतर नवरी तसेच नवरदेव चांगलेच आनंदात असल्याचे दिसतेय. लग्नसोहळा पार पडल्यानंतर नवरी आणि नवरदेव एकमेकांना रसगुल्ले भरवत आहेत. यावेळी नव्या जोडीच्या आजूबाजूला अनेक लोक उभे आहेत. आजूबाजूला लोक असूनही ही नवी जोडी एकमेकांना रसगुल्ले भरवत आहे. सुरुवातीला नवरीने नवरदेवाला प्रेमाने रसगुल्ला खायला दिला आहे. नवरदेवानेही अतिशय प्रेमाने रसगुल्ला घेतल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतेय. त्यानंतर नवरदेव आपल्या नवरीला तेवढ्याच प्रेमाने रसगुल्ले खायला देईल असे आपल्याला वाटते.

नवरदेवाकडून नवरीचा कसलाही विचार नाही

मात्र, प्रत्यक्षात लाजऱ्या नवरीचा कसलाही विचार न करता नवरदेव तिला तिच्या इच्छेविरुद्ध रसगुल्ले खायला देतो आहे. नवरदेवाने नवरीचे डोके पकडून तिच्या तोंडात रसगुल्ला टाकला आहे. नवरी नकार देत असूनही नवरदेव नवरीशी रसगुल्ला खाण्यासाठी जबरदस्ती करतो आहे.

पाहा व्हिडिओ :

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी नवऱ्या मुलाची ही पद्धत चुकीची असल्याचे म्हटले आहे. तर काही लोकांनी या व्हिडीओकडे एक गंमत म्हणून पाहिले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकलेले नाही. मात्र, official_niranjanm87 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | वय झालं तरी तारुण्य संपलं नाही, आजोबांचा नातीसोबत जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

तिचा UPSC चा निकाल लागला, पेपरात फोटो आला पण पावसात बॉयफ्रेंडसोबत फिरतानाचा, पुढं त्या मुलीचं-मुलाचं नेमकं काय झालं?

VIDEO : एका बाईकवरून चौघांचा प्रवास, अचानक सर्वचजण पडले, मग काय झालं पाहाच

(Bride and Groom eating Rasgulla funny video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI