Video : वरात दारी आली, नवरीने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, “ही वेडी झालीय!”

Video : वरात दारी आली, नवरीने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, ही वेडी झालीय!
व्हायरल व्हीडिओ

सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकांची मनं जिंकत आहे. या व्हीडीओतील वधूची स्टाइल पाहून तुमचंही मन प्रफुल्लित होईल. लग्नमंडपाबाहेर मिरवणूक आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आयेशा सय्यद

|

May 14, 2022 | 11:40 AM

मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे अनेक मजेशीर व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. यातले काही व्हीडिओ लोकांचं लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नवरीच्या हावभावांची सर्वाधिक चर्चा होतेय. नवरदेवाची वरात आल्यानंतर नवरी ज्या पद्धतीने वागते त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. वर जेव्हा मिरवणुकीसह लग्नमंडपात पोहोचतो तेव्हा वधूच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो. मिरवणूक पाहण्यासाठी वधू बाल्कनीत पोहोचल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल.तसाच आनंद ही नवरीही व्यक्त करतेय. तिच्या या आनंद व्यक्त करण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा (Viral Video) आहे.

सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकांची मनं जिंकत आहे. या व्हीडीओतील वधूची स्टाइल पाहून तुमचंही मन प्रफुल्लित होईल. लग्नमंडपाबाहेर मिरवणूक आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही खबर समजताच वधूला आनंद होतो. ती बाल्कनीत धाव घेते. यानंतर ती वराकडे प्रेमाने बघते. तिच्या वराला लग्नाच्या पोशाखात पाहून वधूचे मन प्रसन्न होतं. अन् ती आनंदाच्या भरात नाचू लागते. तिची ही कृती अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणतेय.

नेटकरी काय म्हणतात?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओमधल्या नवरीची खूपच चर्चा आहे. वरात आल्याचं पाहिल्यानंतर तिने दिलेल्या हावभावाची जोरदार चर्चा आहे. अनेक नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकाने म्हटलंय की, “किती तो उत्साह! किती तो आनंद सगळेच जण आपल्या लग्नाच्या वेळी असेच आनंदी असतात.” आणखी एक नेटकरी म्हणतोय, की “ही वेडी झाली आहे.”

‘जरा हटके’ वाला व्हायरल

सध्या सोशल मीडियावर लग्नाचा आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.या व्हीडीओमध्ये लग्नातल्या हार घालण्याच्या विधीवेळी गंमत घडते.वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. यावेळी वधूच्या मैत्रिणी तिची चेष्टा करायला लागतात. तेव्हा ही नवरीबाई चिडते.तिचा हा सगळा राग तिच्या हार घालण्याच्या प्रक्रियेमध्ये दिसतो. ती रागात नवरदेवाच्या गळ्यात हार घालते. मग नवरदेवही तिच्या गळ्यात हार घालतो. पण तिचं त्याच्याकडेही लक्ष नसतं ती रागातच तिच्या या मैत्रिणींकडे पाहाते. यावेळी व्हीडिओ काढणारी व्यक्ती हॅपी बर्थ डे टू यू, असं म्हणते. विशेष म्हणजे नवरीच्या या चिडलेल्या व्हीडिओला तुम जब ऐसे शरमाती हो, हे गाणं बॅगराऊंडला लावलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें